कधी लागणार 10वी-12 वीचा निकाल ?

When will the 10th-12th results be out?

 

 

 

गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी ज्या गोष्टीकडे लक्ष ठेवून आहेत, अखेर तो क्षण जवळ येणार आहे. इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालाबाबतची एक मोठी अपडेट समोर आली आहे.

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे घेण्यात आलेल्या दहावी – बारावीच्या 21 लाख विद्यार्थ्यांच्या निकालाबद्दल एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

 

10वी-12 वीच्या विद्यार्थांचा लवकरच निकाल लागणार आहे. मे महिन्यात या दोन्ही परीक्षांचा निकाल जाहीर होणार आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा, तर दुसर्‍या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे देण्यात आली.

 

या निकालाच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असेही बोर्डाकडून सांगण्यात आले. 15 मे पर्यंत निकाल लागू शकतो. मात्र यामुळे विद्यार्थी आणि पालक दोघांचीही धडधड वाढली आहे.

 

 

यावर्षी 11 फेब्रुवारी ते 18 मार्च पर्यंत 12 वीची परीक्षा झाली होती. यंदा एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली. 3 हजार 373 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडली. तर इयत्ता 10 वी ची परीक्षा 21 फेब्रुवारी रोजी सुरू झाली ती 17 मार्चपर्यंत होती.

 

विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी पुरेसा वेळ मिळावा, या हेतूने बोर्डाने यंदाच्या वर्षी परीक्षा आधीच घेतल्या आणि निकालही लवकर जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

त्यामुळे आता मे महिना संपायच्या आतच दोन्ही (10वी , 12वी) इयत्तांचे निकाल लागणार असून त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठीही पुरेसा वेळ मिळेल.

 

लवकर निकाल जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेला वेळेवर सामोरे जाण्यास मदत होणार आहे.

 

यापूर्वी, निकाल उशिरा लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील वर्षीची प्रवेश प्रक्रिया आणि पुरवणी परीक्षांसाठी कमी वेळ मिळत असे. मात्र यंदा तसे होणार नाही.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *