लाडक्या बहिणींचा एप्रिल महिन्याचा हफ्ता कधी मिळणार? का होतोय उशीर ?

Dear sisters, when will you receive your April salary? Why is it being delayed?

 

 

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची राज्यातील कोट्यवधी महिलांना प्रतीक्षा आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहि‍णींच्या खात्यात येत्या 2 ते 3 दिवसात जमा होईल,

 

अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात.

 

तर, ज्या लाडक्या बहि‍णींना पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे एकूण 12000 रुपये मिळतात त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा 500 रुपये दिले जाणार आहेत.

 

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे.

 

पुढील 2 ते 3 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल.या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे. असं आदिती तटकरे म्हणाल्या.

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना साधारणपणे संबंधित महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे दिले जातात. मात्र, यावेळी एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम जमा करण्यास उशीर झाला आहे.

 

आता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हफ्ता येत्या 2 ते 3 दिवसात मिळतील.. मार्च महिन्यानंतर नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असल्यामुळे

 

तांत्रिक कारणास्तव एप्रिल महिन्याचा हफ्ता थकला असल्याची माहिती आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यामुळे आता हफ्ता थकण्याची शक्यता नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याचा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसात मिळेल, असं आदिती तटकरे म्हणाल्या.

 

यापूर्वी लाडक्या बहि‍णींना राज्य सरकारकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे एकाच वेळी देण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहि‍णींना फेब्रुवारी महिन्याचे 1500 आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये देण्यात आले होते. आता लाडक्या बहि‍णींना एप्रिल महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून चालवण्यात येते. या विभागाकडून आतापर्यंत या योजनेच्या 9 हप्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात जमा झाली आहे.

 

पात्रलाभार्थी महिलांना आतापर्यंत 13500 रुपये मिळाले आहेत. महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी 2 कोटी 47 लाख आहेत. त्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता दिला जाईल.

 

 

पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी मिळणाऱ्या महिलांची संख्या 774148 इतकी आहे. त्यामुळं या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 500 रुपये दिले जाणार आहेत.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *