‘Operation Sindoor’;बीडमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवा ;मागणीने खळबळ

Implement 'Operation Sindoor' in Beed; Demand creates excitement

 

 

 

तर ऑपरेशन सिंदूरचा पार्ट-2 कधी पण सुरू होण्याची भीती पाकिस्तानी नेत्यांना सतावत आहेत. त्यातच बीड येथील गुंडाराज, राजकीय गुन्हेगारी, गावागावातील दादा,

 

भाईंनी उच्छाद माजवला आहे. त्यांना वठणीवर आणण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठी मागणी केली आहे.

 

बीड हा गुंडगिरीचा जिल्हा म्हणून राज्यात बदनाम केला तो राजकीय नेत्यांच्या बगलबच्च्यांनी. त्यांच्या दहशतीने येथील सर्वसामान्यांचे जगणे असह्य केले आहे.

 

राजकीय नेत्यांचे वरदहस्त असलेले अनेक अण्णा येथे आहेत. आका येथे आहेत. कुणाचाही जीव घेण्यात त्यांना काहीच वाटत नाही.

 

जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख अजूनही कमी झाला नसल्याचे चित्र काल काही तरुणांनी एका तरुणाला केलेल्या अमानुष मारहाणीवरून समोर आले आहे. बीडमधील परिस्थिती भयानक असल्याचे मारहाणीच्या व्हिडिओवरून दिसून येते.

 

यापूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. सुरुवातीला हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनीच राजकीय नेत्यांच्या दहशतीने प्रकरणात तपास केला नसल्याचे उघड झाले.

 

जनरेट्यापुढे झुकत अनेक बडे चेहरे सध्या तुरूंगात आहे. पण अजूनही मसल्स आणि मनी पॉवरपुढे सर्वसामान्यांचे काहीच चालत नसल्याचे बीडमधील अनेक प्रकरणावरून समोर आले आहे.

 

बीडमध्ये मध्यंतरी एकामागून एक दादा भाईंच्या दहशतीचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते. पण तरीही थातूरमातूर कारवाई पलीकडे ठोस असे काही घडत नसल्याचे दिसून आले आहे.

 

 

जसे आपण ऑपरेशन सिंदूर सीमेवर केले होते, तसेच महाराष्ट्राच्या बीडमध्ये केले पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. बीडचा परळी म्हणजे आता दहशतीचा अड्डा झालेला आहे.

 

आणि खरंच याला आता अतिशय गंभीर ते ना घ्यायला हवं. कारण कालची जी मारहाण झाली. त्याच्यात सगळे मुले अतिशय छोटी होती.

 

18 वर्षाच्या आसपासचे होते. जसा आपण ऑपरेशन सिंदूर सीमेवर केला होता तसाच महाराष्ट्राच्या बीडमध्ये केला पाहिजे, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.

 

त्यांच्या या मागणीने एकच खळबळ उडाली आहे. तर काहींनी त्यांची ही मागणी रास्त असल्याचे समाज माध्यमांवर भावना व्यक्त केल्या आहेत.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *