प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का, कोर्टाने वाढीव मतदानाची याचिका फेटाळली
Big blow to Prakash Ambedkar, court rejects plea for increased voting


वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची निवडणूक आयोगाविरोधातील याचिका फेटाळण्यात आली आहे. मुंबई हाय कोर्टानं ही याचिका फेटाळली आहे.
राहुल गांधींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात घोटाळ्याचा आरोप
विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाच वाजेनंतर झालेल्या 76 लाख मतदानावर प्रकाश आंबेडकर यांनी अक्षेप घेतला होता. ही याचिका काल दिवसभर ऐकून आमच्या कामकाजाचा वेळ वाया गेला, असंही हाय कोर्टानं म्हटलं आहे.
अमेरिकेत एअर स्ट्राईकची सीक्रेट रिपोर्ट लीक; ट्रम्प तोंडावर पडले
प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर काल संध्याकाळपर्यंत सुनावणी झाली होती.
या याचिकेसंदर्भातील निर्णय देण्यासाठी न्यायालयानं राखून ठेवला होता. त्यानंतर आजा मुंबई हाय कोर्टानं यासंदर्भातील निर्णय दिला आहे.
अजित पवार आणि शिंदे गटात नाराजीनाट्य ;महायुतीत पडद्यामागे हालचालींना वेग
मुंबई हाय कोर्टानं प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीत सायंकाळी पाच वाजेनंतर झालेल्या 76 लाख मतदानावर आक्षेप घेऊन, निवडणूक आयोगाविरोधात दाखल केलेली याचिका फेटाळली आहे.
या याचिकेमध्ये काही प्रमुख मागण्या आणि अक्षेप होते, त्यामध्ये संध्याकाळी पाचनंतर जे 76 लाख मतदान वाढलं, त्यामध्ये 19 अशा जागा होत्या, ज्यामध्ये मतदान सर्वाधिक वाढलं होतं.
मराठवाड्यात सत्तर लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक
एवढं मतदान अचानक कसं वाढलं, असा प्रश्न त्यांनी आपल्या याचिकेमधून उपस्थित केला होता. प्रकाश आंबेडकर यांच्या या याचिकेवर काल दिवसभर सविस्तर युक्तिवाद झाला.
न्यायालयानं या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. आज न्यायालयानं या संदर्भात निकाल दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांची याचिका फेटाळून लावण्यात आली आहे.
हिंदीचा मुद्दा तापला ;सहा जुलै रोजी मोर्चा
न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरीफ यांच्या खंडपिठानं हा निकाल दिला आहे. न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली आहे. काल दिवसभर ही याचिका ऐकून आमच्या कामकाजाचा वेळ वाया गेला असंही न्यायालयानं म्हटलं आहे.
विधानसभा निवडणुकीत पाच वाजेनंतर तब्बल 76 लाख मतदान झालं होतं, या वाढीव मतदानावर आंबेडकर यांनी आक्षेप घेतला होता,
आता मोटारसायकललाही भरावा लागनार टोल टॅक्स
या प्रकरणात त्यांनी निवडणूक आयोगाविरोधात हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र त्यांची ही याचिका फेटाळण्यात आली आहे.