शाळेच्या मुख्याध्यापकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

School principal commits suicide by jumping into well,Incident of Principal Maruti Varkat committing suicide by jumping into a well

bj admission
bj admission

 

 

,

राज्यात गेल्या काही दिवसांत शिक्षकांच्या आत्महत्येच्या घटना वाढत असल्याचं चित्र आहे. अशातच कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे.

 

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलीस गोत्यात; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

कागल नगरपालिकेच्या शाळेत कार्यरत असलेल्या मुख्याध्यापक मारुती व्हरकट यांनी विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला “जय गुजरात”चा नारा ,शिवसैनिकांमध्ये चलबिचल

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तातडीने शोधकार्य सुरू केलं. अग्निशमन विभागाच्या मदतीने आज सकाळी मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी यावेळी घटनास्थळी जमली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

 

ठाकरे गटाकडून बॅनरबाजी;चुकीची रिक्षा पकडलीत, परत या! अन्यथा गुजरातला…,

मारुती व्हरकट हे कागल नगरपालिकेच्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी आत्महत्या का केली, यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यांच्या अचानक घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे नातेवाईक, सहकारी शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

 

 

इम्तियाज जलील यांचा दावा;शिंदेंकडून दगाफटक्याची भीती म्हणून राज-उद्धवना एकत्र आणण्याचा प्लॅन फडणवीसांचा

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. आत्महत्येमागील कारण स्पष्ट होण्यासाठी पोलीस विविध अंगाने तपास करत आहेत.

 

 

 

Related Articles