राज-उद्धव ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया
Shinde group's first reaction to Raj-Uddhav Thackeray's victory rally, Raj Thackeray's speech highlighted the issue of Marathi, while Uddhav Thackeray's speech only hinted at defeat; Shinde group's first reaction to the victorious rally


महाराष्ट्रात महायुती सरकारकडून हिंदी सक्ती लादण्याचा प्रयत्न झाल्यानंतर राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली. या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संयुक्तपणे मोर्चा काढण्याचा इशारा दिला.
ठाकरे गटाकडून बॅनरबाजी;चुकीची रिक्षा पकडलीत, परत या! अन्यथा गुजरातला…,
परिणामी, अवघ्या काही दिवसांत सरकारला हिंदी सक्तीविषयक जीआर मागे घ्यावा लागला. याच पार्श्वभूमीवर आज (दि. 5 जुलै) वरळी डोममध्ये ‘विजय मेळावा’ पार पडला.
या मेळाव्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लबोल केला. एक गद्दार बोलला, जय गुजरात. किती लाचारी करायची?
शाळेच्या मुख्याध्यापकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
हिंदी सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांचा विचारांचा पाईक होईल का? असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. आता यावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
खासदार नरेश म्हस्के यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. ते म्हणाले की, राज ठाकरे यांच्या भाषणात मराठीचा मुद्दा दिसला.
उद्धव ठाकरे म्हणाले ;भाजपवाल्यांना कधी कोणाच्या लग्नात बोलवू नका
परंतु, उद्धव ठाकरे यांच्या भाषणात नेहमीप्रमाणे नटदृष्टपणा, टोमणे होते. मराठीचा मुद्दा कुठेही नव्हता. त्यांचा जो काही पराजय झालेला आहे त्याची सल त्या भाषणातून दिसून आली. बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला,
अशा पद्धतीने राज ठाकरे यांच्यावर त्यांनी टीका केली होती. आता मुंबईच नाही तर महाराष्ट्राची सत्ता मला मिळवायची आहे तर राज ठाकरे यांनी सोबत यायला पाहिजे. युती करायला पाहिजे, ही याचना त्यांच्या भाषणातून दिसून आल्याचे नरेश म्हस्के म्हणाले.
उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर हल्लाबोल !
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर जय गुजरातचा नारा दिला. यावरून उद्धव ठाके यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
एक गद्दार बोलला, जय गुजरात. किती लाचारी करायची? हिंदी सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांचा विचारांचा पाईक होईल का? असे त्यांनी म्हटले. हिंदी सक्ती करण्याचा प्रयत्न केला,
राज आणि उद्धव युती झाली आता महाविकास आघाडी…
तर शक्ती अशी दाखवू पुन्हा डोकं वर काढणार नाही, असा गर्भित इशारादेखील त्यांनी दिला. म महापालिकेचा नाही, महाराष्ट्राचा सुद्धा आहे, आम्ही तो काबीज करू, असे म्हणत त्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत युतीचे संकेत दिले.