9 जुलैपर्यंत धुमशान; वादळी वारे,मुसळधार पावसाचा अलर्ट

Dhumshan till July 9; Alert of gale force winds, heavy rain,Monsoon Alert: Beware! Only smoke till July 9; Stormy winds and what is the IMD alert? In Konkan…

 

bj admission
bj admission

 

 

 

भारतीय हवामान विभागाने राज्याला पुढील 2 दिवस तुफान पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांमुळे राज्यात पुस जोरदार बॅटिंग करणार आहे. महाराष्ट्राला 9 जुलैपर्यंत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 

इम्तियाज जलील यांचा दावा;शिंदेंकडून दगाफटक्याची भीती म्हणून राज-उद्धवना एकत्र आणण्याचा प्लॅन फडणवीसांचा

 

कोकण किनारपट्टी, मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाडा व विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. आज कोकण किनारपट्टीवर असलेल्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 

 

9 जुलैपर्यंत संपूर्ण राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांमुळे बंगालचा उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याचा परिणाम राज्यावर देखील होताना दिसून येणार आहे. कोकण, मध्य महराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात तूफान पाऊस होऊ शकतो. वादळी वारे आणि जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 

निधीवाटपाचा वाद मिटेना ,पडद्यामागे महायुतीत मोठ्या हालचाली

गेले काही दिवस कोकण किनारपट्टी, घाटमाथा, तर पुणे, सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. पुढील चार दिवस रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.

 

ईडी ऍक्टिव्ह मोडमध्ये सोनिया,राहुल गांधींवर २००० कोटींचा घोटाळा केल्याचाआरोप

 

पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.

 

 

देवभूमी उत्तराखंडमध्ये तर पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, रूद्रप्रयाग, उत्तरकशी, डेहराडून, हरिद्वार, नैनीताल या जिल्ह्यांत आज दिवसभरात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर हल्लाबोल !

सिमला हवामान विभगाने या जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तराखंड राजुयत मान्सून दाखलजल्यापासून विविध घटनांमध्ये आतापर्यंत 20 नागरिकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

 

 

 

संपूर्ण देश मान्सूनने व्यापला आहे. देशातील अनेक राज्यात तूफान पाऊस सुरू आहे. हिमाचल प्रदेशमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. हिमाचल प्रदेशमधील कुल्लू आणि कांगडा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. यामुळे सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळत आहे.

 

शाळेच्या मुख्याध्यापकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

 

मान्सूनने संपूर्ण भारत व्यापला आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अनेक राज्यात मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

 

 

ठाकरे गटाकडून बॅनरबाजी;चुकीची रिक्षा पकडलीत, परत या! अन्यथा गुजरातला…,

 

उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. खास करून हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांत तर अति ते अति मुसळधार पाऊस कोसळत आहे. नद्यांना पूर आला आहे. आज आणि उदय उत्तरेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

 

 

दिल्लीत देखील आज पुस होण्याचा अंदाज आहे. आज दिल्ली वादळी वाऱ्यांसह पाऊस होऊ शकतो. दिल्लीत 11 जुलैपर्यंत माध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

 

उद्धव ठाकरे म्हणाले ;भाजपवाल्यांना कधी कोणाच्या लग्नात बोलवू नका

 

उत्तर प्रदेश राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तर पुढील दोन ते तीन याच जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होण्याचाइशारा हवामान विभागाने दिला आहे. तर बिहारच्या कैमुर ते रोहतास या भागात अति ते अति मुसळधार पाऊस होण्याचाअंदाज आहे. 11 जुलै पर्यंत उत्तर-पश्चिम भारतात जोरदार पुस होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर हल्लाबोल !

 

पंजाब, हरियाणा, हिमाचल, राजस्थान, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंड या राज्यांना बहरतीय हवामान विभागाने अति ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या राज्यात 11 तारखेपर्यंत जोरदार पाऊस होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणेचे आवाहन सरकाने केले आहे. हरियाणा आणि पंजाबला रेड अलर्ट देण्यात आला आहे.

 

 

राज-उद्धव ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया

 

कर्नाटक, केरळ या राज्यात प्रचंड पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच दक्षिण भारतातील अनेक राज्यांत 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारेदेखील वाहण्याची शक्यता आहे. समुद्रकिनारी असणाऱ्या राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ठाकरेंच्या विजयी मेळाव्यापासून काँग्रेस चार हात दूर

 

 

भारतीय हवामान विभागाने राज्याला पुढील 2 दिवस तुफान पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांमुळे राज्यात पुस जोरदार बॅटिंग करणार आहे. महाराष्ट्राला 9 जुलैपर्यंत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 

उद्धव ठाकरे शिंदेंना म्हणाले होते ,’उठेगा नहीं ,शिंदेनी दिले प्रत्युत्तर

कोकण किनारपट्टी, मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाडा व विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. आज कोकण किनारपट्टीवर असलेल्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 

 

 

Related Articles