भाजपच्या माजी मंत्र्याचा शिवसेनेत प्रवेश
Former BJP minister joins Shiv Sena


भाजपमधून निलंबित माजी मंत्री जगदीश गुप्ता यांनी मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला. गुप्ता यांनी मागील वर्षी भाजपशी काडीमोड घेत अमरावती मतदारसंघातून अपक्ष विधानसभा निवडणूक लढविली होती.
संजय राऊतांनी भाजप खासदार दुबेला दिली तंबी ,दुबेला सांगा……
गुप्ता यांनी 1990 मध्ये भाजपच्या तिकिटावर अमरावती विधानसभेची निवडणूक लढविली होती. या निवडणुकीतील विजयानंतर त्यांना मंत्रिपद मिळाली.
अमरावतीचे पालकमंत्री म्हणूनही संधी देण्यात आली होती. नंतरच्या निवडणुकीत काँग्रेसचे डॉ. सुनील देशमुख यांनी त्यांचा पराभव केला होता. परंतु गुप्ता यांनी विधानपरिषदेवर निवडणूक जात आमदारकी मिळविली.
Marathi Morcha in Mira bhayandar: मीरा भाईंदरमध्ये बंदी झुगारली, निघाला मराठी मोर्चा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून ते 12 वर्षे आमदार राहिले. याच काळात त्यांना पक्षातून डावलण्यात आले होते. परंतु काही वर्षांपूर्वी त्यांना पुन्हा पक्षात घेण्यात आले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षातून तिकीट मिळण्याची अपेक्षा मावळल्यानंतर त्यांनी अमरावती विधानसभेत अपक्ष दंड थोपटले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुलभा खोडके आणि काँग्रेसचे सुनील देशमुख यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. यानंतर गुप्ता भाजपमध्ये परतण्याची शक्यता वर्तविली जात होती.
डोनाल्ड ट्रम्प यांचा 14 देशांवर 40 टक्क्यांचा ‘टॅरिफ बॉम्ब’
परंतु सोमवारी सायंकाळी त्यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश घेतला. त्यांच्यासोबत शेकडो समर्थकांनीही शिवसेनेत प्रवेश केला. आगामी महापालिका व विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने गुप्ता यांचा शिवसेना प्रवेश महत्वाचा मानला जात आहे.