मंत्री संजय शिरसाट यांच्यावर पैशांची बॅग घेऊन बसल्याचा आरोप
Minister Sanjay Shirsat accused of sitting with a bag of money,Carefree behavior with a cigarette in hand, viral video of the headscarf causing a stir, bag full of money


शिवसेनेचे आमदार आणि मंत्री संजय शिरसाट यांना इन्कम टॅक्स विभागाने नोटीस धाडली आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर पैशांची बॅग घेऊन बसल्याचा आरोप केला आहे.
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही निवडणूक चोरण्याचा प्रयत्न
आता या आरोपांमुळे आता राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. कारण संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
संजय राऊत यांनी आरोप केल्यानंतर संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. संजय शिरसाट एका बेडवर बसून फोनवर बोलताना दिसत आहेत.
सर्व कार्यक्रम रद्द करून एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीत भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी
त्यातच त्यांच्या शेजारी पैशांची भरलेली एक बॅग दिसून येत आहे. मात्र आता या व्हिडिओवर आणि संजय राऊत यांच्या आरोपांवर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांमध्ये समोर आलेल्या व्हिडिओवर बोलताना मंत्री संजय शिरसाट म्हणाले, ‘मी आत्ताच हा व्हिडीओ पहिला. मात्र ते हॉटेल नाही तर, ते माझे घर आहे. मी घरात बसलो आहे. माझ्या घराची ती बेडरूम आहे.
BREAKING NEWS;गृहमंत्री अमित शाह यांचे निवृत्तीबाबत मोठे विधान
या व्हिडिओबद्दल मला आश्चर्य वाटत नाही. माझ्या शेजारी माझा लाडका कुत्रा बसला आहे. मला टार्गेट करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहे. एवढी मोठी बॅग पैशांची असेल तर घरातली कपाटे मेली आहेत का? त्यात पैसे नाही तर कपडे असलेली बॅग आहे.
मुर्खासारखे स्टेटमेंट करणे हे संजय राऊतलाच जमू शकते. सकाळ, दुपार आणि रात्री संजय राऊतांना एकनाथ शिंदेंचं दिसत आहेत. त्यांची गेलेली सत्ता आजही त्यांना स्वस्थ बसून देत नाही.
चित्रपट क्षेत्रातील अभिनेते,अभिनेत्रींवर ईडीने केला गुन्हा दाखल;पाहा काय आहे प्रकरण ?
संजय राऊतसारखा वेडा माणूस, त्याच्यासाठी आम्ही ठाण्याला हॉस्पिटलमध्ये बेड ठेवलेला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ कोणी काढला यावर माझा आक्षेप नाही.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आयकर विभागाची थेट शिंदे गटाच्या मंत्र्याला नोटीस
आयकर विभागाने त्यांना नोटीस बजावली आहे. याबाबतची माहिती खुद्द शिरसाट यांनी दिली आहे. आयकर विभागाच्या नोटिशीमुळे राजकीय वतुर्ळात एकच चर्चा सुरु आहे.
मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्या ‘विट्स हॉटेल’ची चर्चा सुरु आहे. छत्रपती संभाजीनगरातील विट्स हॉटेलची किंमत 110 कोटी रुपये असताना, ते केवळ 67 कोटी रुपयांना संजय शिरसाट यांच्या मुलाने विकत घेतले,
शिक्षण उपसंचालकावर निलंबनाची कारवाई, SIT चौकशी होणार
असा आरोप होत आहे. याप्रकरणाच्या चौकशीची मागणी विरोधकांकडून केली जात होती. असे असताना आता आयकर विभागाने नोटीस बजावली आहे.