व्यापाऱ्याकडील तब्बल पावणे पाच किलो सोने लुटले

Nearly five and a half kilos of gold were looted from a merchant.

 

 

 

पोळा सणाच्या संध्याकाळी समृद्धी महामार्गावर एका व्यापाऱ्याला लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 

खामगावहून मुंबईला जाणाऱ्या व्यापाऱ्याकडून तब्बल पावणे पाच किलो सोने लुटण्यात आले असून, यामागे त्याचाच चालक असल्याचा पोलिसांना संशय आहे.

 

खामगाव येथील व्यापारी अनिल शेशमलजी जैन चौधरी हे त्यांच्या गाडीने मुंबईकडे जात होते.

 

फर्दापूर टोल नाका ओलांडल्यावर त्यांच्या चालकाने ‘पोट खराब झाल्याचे’ कारण देत गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली.

 

त्याचवेळी, त्यांच्या पाठीमागून आलेल्या एका चारचाकी गाडीतून ४ ते ५ दरोडेखोर बाहेर आले.

 

त्यांनी अनिल जैन यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली, चाकूचा धाक दाखवला आणि त्यांच्याकडील सोन्याने भरलेली बॅग हिसकावली. या बॅगेत सुमारे पावणे पाच किलो सोने होते.

 

 

या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, व्यापाऱ्याचा चालकही या कटात सामील होता. त्यानेच दरोडेखोरांना मदत केली.

 

सोने असलेली बॅग घेऊन तो दरोडेखोरांच्या गाडीत बसला आणि सर्वजण मालेगावच्या दिशेने पळून गेले.

 

या घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

 

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, दरोडेखोरांची गाडी मालेगाव टोल नाका ओलांडून पातुरच्या दिशेने गेल्याचे दिसून आले. सध्या पोलीस या दरोडेखोरांचा कसून शोध घेत आहेत.

 

 

या घटनेमुळे समृद्धी महामार्गावर वाढलेल्या लूटमारीच्या घटना पुन्हा एकदा अधोरेखित झाल्या आहेत.

 

अपघात कमी झाले असले तरी गुन्हेगारीच्या घटना वाढल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जखमी व्यापारी अनिल जैन यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

 

 

 

Related Articles