मराठा आरक्षण आंदोलनामुळे दक्षिण मुंबई ठप्प

South Mumbai comes to a standstill due to Maratha reservation agitation

 

 

 

मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळपासून आझाद मैदानावर आंदोलन सुरू झाले.

 

यामध्ये हजारो आंदोलक सहभागी होणार असल्याने या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सीएसएमटी परिसरातील दुकाने आणि हॉटेल बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

स्वारातीम चे वित्त व लेखाधिकारी महमद शकील अब्दुल करीम यांच्या संघर्षाचा प्रवास, उन्नती कडे

दिवसभर हॉटेल, दुकाने बंद राहिल्याने आंदोलकांच्या जेवणाची गैरसोय झाली. तर आंदोलन १५ दिवस चालेल याचा अंदाज घेऊन मराठा आंदोलक पंधरा दिवसांचे अन्नधान्य घेऊन आझाद मैदान परिसरात दाखल झाले आहे.

 

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानात एक दिवसाचे आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली होती.

दहावीची परीक्षा होणार फेब्रुवारीत

त्यानुसार राज्यभरातील हजारो मराठा बांधव रात्रीपासूनच आझाद मैदान परिसरात दाखल होत होते. आंदोलन सुरू होण्यापूर्वीच आझाद वेळापत्रक कोलमडले, अनेक बसेस ३०-४५ मिनिटे उशिरा धावत होत्या.

 

दक्षिण मुंबई शुक्रवारी अक्षरशः ठप्प झाली, कारण हजारो मराठा आरक्षण आंदोलनकर्ते आझाद मैदानात जमा झाले. यामुळे संपूर्ण शहरातील वाहनतळ व सार्वजनिक वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.

उपमुख्यमंत्री अजित पवारांवर कांद्याने हल्याचा प्रयत्न ,दोघांना अटक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसरात प्रचंड गर्दी झाल्याने ऑफिसला जाणाऱ्यांना, विद्यार्थ्यांना व रोजच्या प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.

 

 

सेंट्रल रेल्वेने जाहीर सूचना देत प्रवाशांना शक्यतो सीएसएमटीकडे प्रवास टाळावा, असे आवाहन केले. “सीएसएमटी स्थानक व परिसरात प्रचंड गर्दी झाल्याने प्रवाशांनी आवश्यक असल्यासच टर्मिनसला जावे,” अशी पोस्ट विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर केली.

मनोज जरांगे पाटलांचे मुंबईत आंदोलन ; रोहित पवारांचा गंभीर आरोप

सकाळच्या गर्दीच्या वेळी परिस्थिती अधिकच बिकट झाली. सीएसएमटीवर उतरलेले हजारो कामगार पायी, बस किंवा टॅक्सीने फोर्ट, नरीमन पॉइंट, कालबादेवी, क्रॉफर्ड मार्केटकडे जात असतात.

भाजप मंत्र्याने ‘लक्ष्मण हाके यांना सुनावले म्हणाले ,लुडबुड करु नये

परंतु सीएसएमटीजवळील कोंडीमुळे अनेक जण अडकले. काही बस सीएसएमटीजवळ दीर्घकाळ अडकल्या होत्या. परिणामी प्रवासी लांब पल्ल्याचा पायी प्रवास करताना दिसले. पूर्वीय महामार्गालाही (ईस्टर्न फ्रीवे) कोंडीचा फटका बसला.

 

 

 

Related Articles