मनोज जरांगे सोबत पहिलीच चर्चा निष्फळ

The first discussion with Manoj Jarange was fruitless.

 

 

 

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. राज्यातील कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समितीची स्थापना करण्यात आली आहे.

 

ट्रम्प यांचा नवा दावा;भारत-पाकिस्तानने एकमेकांची ७ विमाने पाडली

या समितीने गेल्या 13 महिन्यांमध्ये राज्यातील अनेक कुणबी नोंदी शोधल्या आहेत. आज निवृत्ती न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली.

 

यावेळी जरांगे पाटील आणि शिंदे यांच्यात 4 महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. हे मुद्दे कोणते आहेत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

स्वारातीम चे वित्त व लेखाधिकारी महमद शकील अब्दुल करीम यांच्या संघर्षाचा प्रवास, उन्नती कडे
आज माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे आणि जरांगे पाटलांमध्ये सातारा आणि हैद्राबादच्या संस्थानात सापडलेल्या कुणबी नोंदींबाबत चर्चा झाली. शिंदे समितीने जरांगे पाटलांकडे काही वेळेची मागणी केली.

 

मात्र सातारा आणि हैद्राबादच्या गॅझिटेरिअरला एक मिनिटाचा वेळ देणार नाही असं जरांगे पाटलांनी म्हटलं आहे. ‘कारण शिंदे समितीने 13 महिने अभ्यास केला आहे.

मनोज जरांगे पाटलांचे मुंबईत आंदोलन ; रोहित पवारांचा गंभीर आरोप

मराठवाड्यातील मराठा कुणबी आहे, असं जाहीर करा आणि उद्यापासूनच प्रमाणपत्र द्या. या दोन गॅझेट नुसार मराठवाड्यातील मराठा हा कुणबीच आहे. यात वादच नाही आणि तोडच नाही असंही ते म्हणाले.

 

शिंदे समितीने औंध आणि मुंबई गव्हर्नमेंट गॅझेटच्या अभ्यासासाठी वेळ मागितला आहे. यावर बोलताना जरांगे पाटलांनी अभ्यासासाठी दोन महिन्यांचा वेळ देतो असं सांगितलं.

भाजप मंत्र्याने ‘लक्ष्मण हाके यांना सुनावले म्हणाले ,लुडबुड करु नये

जरांगे म्हणाले की, ‘आम्ही औंध आणि बॉम्बे गव्हर्नेमेंटला वेळ द्यायला तयार आहे. सहा महिन्याऐवजी दोन महिन्याचा कालावधी देऊ. मात्र सातारा आणि हैद्राबादच्या गॅझेटमध्ये नियमात तरतूद करून लगेच अंमलबजावणी करा. त्याला वेळ देणार नाही.’

 

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यावर बोलताना, ‘जरांगे पाटील म्हणाले की, आंदोलकांवर दाखल झालेल्या केसेसही सरसकट मागे घ्या.

मराठा आरक्षण आंदोलनामुळे दक्षिण मुंबई ठप्प

आमच्यावर हल्ला झाला. आम्ही हल्ला केला नाही. पोलिस अधिकाऱ्यांवर हाफ मर्डरचा गुन्हा दाखल करा. त्यांना बडतर्फ करा. यात अनेक पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे.’

 

मराठा आरक्षणासाठी लढा देताना अनेक मराठा बांधवांचा मृत्यू झाला आहे. यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, ‘ज्या लोकांनी आरक्षणासाठी बलिदान दिलं आहे, त्याची लेकरं बाळं उघडे पडले आहे,

नांदेड जिल्ह्यातील पाच हजारांहून अधिक नागरिक सुरक्षितस्थळी, सैन्यदलाची बटालियन दाखल

त्याच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे. त्या सर्वांना लगेच नोकरी आणि 10 लाखांचा निधी द्या. त्या कुटुंबातील माणूस माघारी येऊ शकत नाही, मात्र या निधीमुळे मुलांना शिकवण्यासाठी मदत होईल. या मागणीबाबत कोणतीही तडजोड होणार नाही.’

 

 

Related Articles