आमदाराचा पुतण्याच प्रतिआमदार बनून थेट सरकारी कार्यक्रमात
The MLA's nephew became a deputy MLA and participated directly in government programs.

एखाद्या गावात महिला सरपंच असेल तर अनेकदा त्या महिला संरपंचाचा पती प्रतिसरपंच झाल्याचं आपण पाहिलं आहे. सरपंच पत्नीच्या जागी कार्यक्रमांना हजेरी लावणं, भाषणं ठोकणं हे प्रतिसरपंच बनुन महिला सरपंचाचा पती करत असतो.
मात्र इकडे रायगडमध्ये तर चक्क आमदाराचा पुतण्यात प्रतिआमदार झाल्याचं पाहायला मिळालं. आमदाराऐवजी आमदार पुतण्याने सरकारी कार्यशाळेला हजेरी लावली आणि भाषण करून थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांनाच मार्गदर्शनही केलं.
आमदाराच्या कारची युवकाला धडक,जखमी तरुण गेला कोमात
त्यावरून आता या आमदारावर टीकेची झोड उठली आहे.. रायगडमधील हा आमदार कोण? आणि नेमकं काय झालं.. पाहुया सविस्तर.
ही दृष्य आहेत रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या कार्यशाळेची… आता या कार्यशाळेला उपस्थित राहून स्थानिक आमदारांनी मार्गदर्शन करणं अपेक्षित होतं.
इथले स्थानिक आमदार आहे शिवसेनेचे महेंद्र थोरवे. या कार्यशाळेला स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांना निमंत्रणही देण्यात आलं होतं. मात्र आमदारसाहेबांच्या ऐवजी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचे पुतणे प्रसाद थोरवे..
आता थेट करा मोबाईलवरून करा आधार कार्ड अपडेट
आता आमदारसाहेबांचे पुतणे आमदारांच्या ऐवजी उपस्थित राहिल ते राहिले आणि त्याच्या पुढे जाऊन महेंद्र थोरवेंचे पुतणे प्रसाद थोरवे यांनी भाषण ठोकत चक्क प्रशासकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शनही केल्याचं पाहायला मिळालं.
आता आमदारांच्या पुतण्याला अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा अधिकार कुणी दिला असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. यावरून आता महायुतीमधीलच नेत्यांनीआमदार महेंद्र थोरवेंवर हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्रात मतचोरी फडणवीसांनी राजानीमा द्यावा – सपकाळ
राष्ट्रवादीच्या तालुकाअध्यक्ष रंजना धुळे यांनी यावरून थोरवे यांच्यावर निशाणा साधलाय, तर अधिकाऱ्यांच्या चौकशीचीही त्यांनी मागणी केलीय..
कुणीही येतो आणि कुणाच्याही खुर्चीवर बसतो असं म्हणत पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर निशाणा साधला आहे. तर अनेक मंत्र्यांच्या जागेवर पीएम बैठका घेत असल्याचा आरोपही यावेळी आव्हाड यांनी केला आहे.
सरकारच्या लेटरबॉम्बने लाडक्या बहिणींच्या अडचणी वाढणार
आमदार महेंद्र थोरवे यांच्या अनुपस्थित त्यांचा पुतण्यात प्रतिआमदार झाल्यांचं पाहायला मिळालं.. कोणतंही पद नसताना अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा अधिकार आमदार थोरवेंच्या पुतण्याला कुणी दिली हा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.









