मान्सून कधी परतणार ? हवामान विभागाची महत्वपूर्ण माहिती
When will the monsoon return? Important information from the Meteorological Department
देशासह राज्यामध्ये यंदा मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला होता, महाराष्ट्रात सरासरी सात जूनच्या आसपास मान्सून दाखल होतो. मात्र यंदा 26 मे रोजीच त्याचं राज्यात आगमन झालं होतं.
यंदा राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे.
राज्यातील अनेक गावांना पुराचा वेढा पडला आहे, घरादारात पाणी शिरलं आहे. शेतीमधील पिकंच नाही तर शेती देखील वाहून गेली आहे. ऐन हातातोंडाशी आलेला घास असा निसर्गानं हिरावून घेतल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
पावसानं राज्यभरात धुमाकूळ घातलेला असतानाच आता भारतीय हवामान विभागाच्या नव्या अंदाजानं चिंता वाढवली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आता पावसाच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे.
गेरु आणि केमिकल्सपासून बनवलेले दोन ट्रक नकली बटाटे जप्त
15 सप्टेंबरपासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. येत्या 12 ते 15 ऑक्टोबरपर्यंत मान्सून भारतातून पूर्णपणे परतेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
मात्र जाता-जाता पुन्हा एकदा पाऊस मोठा दणका देणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलं आहे.
परभणीतील ख्वाजा युनूस मृत्यू प्रकरणात दोषी सचिन वाझेला कोर्टाचा झटका
24 ते 27 सप्टेंबर दरम्यान देशातील अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
हवमान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजपासून पुढील दोन दिवस ओडिशा, आंध्र प्रदेश, आणि झारखंडमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्राला देखील हवामान विभागाकडून मोठा इशारा देण्यात आला आहे.
शुक्रवारपासून पुन्हा पावसाचा हाहाकार ,हवामान विभागाचा मोठा इशारा
हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. यंदा सर्वाधिक फटका हा मराठवाड्याला बसला आहे, पिकांचं मोठं नुकसान झालं आहे,
दरम्यान पुढील तीन ते चार दिवस मराठवाड्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसेच विदर्भात ढगाळ वातावरण राहणार असून,
आदिवासी संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण ,वाहनांची तोडफोड, दगडफेक
अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून आता नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि विधानपरिषद आमदार आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार आहेत.
पक्षाचे राज्याध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली असून, महाराष्ट्रातील महापुराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
संकटाच्या या कठीण काळात प्रत्येक नेत्याने महाराष्ट्राच्या जनतेसोबत उभं राहणं गरजेचे असल्याचे तटकरे यांनी सांगितले. दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पूर्वनियोजित सर्व कार्यक्रम रद्द करत
थेट पूरग्रस्त भागात भेट दिली. आज ते सोलापूर, धाराशीव आणि बीड या जिल्ह्यांना स्वतः भेट देत असून, स्थानिक मंत्र्यांसोबत पूरपरिस्थितीची पाहणी करत आहेत.
अजित पवार यांनी आज पीडित नागरिकांशी संवाद साधला आणि प्रशासनाला तातडीने शेतकऱ्यांसाठी मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.







