भाजपच्या आमदार पत्नीला ,पतीने दिली तंबी ;माझा फोटो वापरण्यापासून कार्यकर्त्यांना आवरा

BJP MLA's wife, husband gives warning; Stop workers from using my photo

 

 

पत्नी पुढारी पण पती कारभारी अशीच परिस्थिती सहसा ग्रामीण भागात पाहायला मिळते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील  महिला आरक्षणाचा फायदा घेत अनेक महिला सरपंचपदावर विराजमान झाल्या.

मोदी सरकारला आव्हान देणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक

मात्र, या गावचा कारभार आजही त्यांचे पतीचा पाहतात असे काहीसे चित्र सर्रास दिसून येते. तर, अनेकदा आमदार पत्नीच्या पतींकडेही अशीची जबाबदारी असते. तुलनेने हे प्रमाण कमी असते.

 

 

मात्र, पत्नी आमदार असल्यावर पतीचे फोटोही विविध कार्यक्रमात झळकत असतात. आता, संभाजीनगर जिल्ह्यातील भाजप आमदार पत्नीला अधिकारी असलेल्या पतीने पत्र लिहून माझे फोटो वापरु नका, तशा सूचना तुमच्या कार्यकर्त्यांना द्या, असे म्हटले आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

राहुल गांधी चार देशांच्या दौऱ्यावर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री मतदारसंघात भाजपच्या विविध कार्यक्रमांमध्ये वृत्तपत्र जाहिरात आणि बॅनरवर आमदार अनुराधा चव्हाण यांच्यासोबत त्यांचे पती मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचेही छायाचित्र मोठ्या प्रमाणावर वापरले जात असल्याचे समोर आलं.

 

अनुराधा चव्हाण यांचे पती अतुल चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम विभागात मुख्य अभियंता आहेत. अतुल चव्हाण यांनी त्यांच्या पत्नी आणि आमदार असलेल्या अनुराधा चव्हाण यांना थेट पत्र लिहून कार्यकर्त्यांना आवरण्याची मागणी केली आहे.

ट्रम्प म्हणतात तेल खरेदी बंद करा,मात्र अडाणी-अंबानी प्रेमापोटी ते करायला तयार नाहीत

“आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी माझा फोटो वापरणे थांबवावे आणि माझे नाव किंवा छायाचित्र पक्षाच्या बॅनरवर किंवा जाहिरातीवर टाकणं टाळावे,” अशी स्पष्ट विनंती त्यांनी पत्रातून केली आहे.

 

अधिकारी असलेल्या चव्हाण यांच्या पत्रामुळे फुलंब्री मतदारसंघात राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पती-पत्नीच्या या संवादाला प्रशासनिक आचारसंहितेचा संदर्भ मिळत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

देशभक्त सोनम वांगचुक यांना अटक करता, पाकिस्तानसोबत निर्लज्जासारखी मॅच खेळताय, हीच का देशभक्ती?

”उपरोक्त विषयी सादर करण्यात येते की, आपल्या फुलंब्री मतदार संघातील आपले कार्यकर्ते हे माझे (अतुल भि. चव्हाण) छायाचित्र (फोटो) विविध वृत्तपत्रात तसेच बॅनरवर प्रसिध्द करत आहेत.

 

त्यामुळे माझ्या विरुध्द तक्रारी तसेच माहिती अधिकार अर्ज या कार्यालयास प्राप्त होत आहेत. तरी, आपणांस विनंती करण्यात येते की, माझे छायाचित्र (फोटो) विविध वृत्तपत्रात तसेच बॅनरवर प्रसिध्द

पाहा आज कोनकॊणत्या जिल्ह्याला आस्मानी संकटाचे रेड अलर्ट

न करण्याबाबत आपल्यास्तरावरुन आपल्या मतदार संघातील कार्यकर्त्यांना सुचना देण्यात याव्यात, अशी आपणांस विनंती आहे.”, असा आशय अतुल चव्हाण यांनी आमदार पत्नीला लिहिलेल्या पत्रात आहे.

 

 

Related Articles