मुंबईत 1200 बोगस परप्रांतीय मतदार वाढल्याने खळबळ

Mumbai sees 1200 bogus migrant voters, creating a stir

 

 

महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागलं असून सर्वच पक्षांची मतदारांवर नजर आहे. हमखास मतदान मिळेल अशा मतदारांवर तर विशेष नजर आहे. या पार्श्वभूमीवर गिरगाव भागात एक नवाच प्रकार समोर आला आहे.

 

बोगस मतदार कसे वाढतात याचा हा नमुना आहे. गिरगाव भागातल्या काळबादेवीतील भरुचा नावाच्या सोसायटीतला हा नमुना आहे.

या देशाने केले देशभरात इंटरनेट बंद; नागरिकांचे हाल

इथले खोटे पत्ते वापरुन 148 परप्रांतियांनी अनधिकृतपणे आपलं मतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड काढल्याचं उघड झालं आहे. स्थानिक रहिवासी आणि ‘आम्ही गिरगावकर’ टीमने बनावट कागदपत्रांचं प्रकरण समोर आलं.

 

बनावट आधारकार्ड आणि मतदान ओळखपत्रांसंबंधी लोकांनी तक्रार करताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, परंतु पुढं तपास ढिम्म आहे. या बोगस मतदारांची नावं वगळावी अशी मागणी या भरुचा सोसायटीतल्या लोकांनी केली.

 

ST बस ची दहा टक्के भाडेवाढ
गिरगावातील भरुचा सोसायटी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून काही जण रस्त्यावर झोपड्या बांधून राहतात. संबंधित इमारत आधी भरुचा या नावाने ओळखली जात होती. आता रजिस्ट्रेशन झाल्यावर ही सोसायटी गुलमोहोर नावाने ओळखली जाते.

 

या सोसायटीत राहात नसलेलेही अनेकजण इथे मेंबर असल्याचं लक्षात आलं. या सोसायटीत अस्तित्वातच नसलेल्या फ्लॅटचे पत्ते देत आधी विजेचे मीटर मिळवण्यात आले. मग त्याआधारे पॅन, आधार, मतदार ओळखपत्र या लोकांनी मिळवलं.

 

ज्यावेळी गुलमोहोर सोसायटीच्या बॉक्समध्ये वेगवेगळ्या नावांनी लाईट बिले येऊ लागली त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला.

मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच आत्महत्येचा प्रयत्न

त्यानंतर सोसायटीतील लोकांनी अधिक चौकशी केल्यानंतर बनावट पत्त्याच्या आधारे परप्रांतियांनी वीज मीटर, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र काढल्याचं समोर आलं.

 

ज्या नावाने ही वीज बिलं आली होती त्या सर्व लोकांची घरे नाहीत, सर्व लोक हे रस्त्यावर झोपत असल्याचं समोर आलं. या प्रकरणी गुलमोहोर सोसायटीमधील नागरिकांनी पोलीस, बीएमसी आणि निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे.

 

मंत्रिमंडळ बैठक ; Sep 30, 2025
आतापर्यंत 148 जणांची तक्रार कऱण्यात आली आहे. मात्र जवळपास 1200 जण बोगस असल्याचा दावा करण्यात येत आहे. आता या लोकांना बनावट पत्त्यांच्या आधारे बनावट आधार, पॅन, व्होटर आयडी देणारे दलाल कोण? याचा शोध घेण्याची गरज आहे.

 

 

Related Articles