IPS अधिकाऱ्याला जातीवरून भेदभाव ,अपमान, कंटाळून केली आत्महत्या ;देशात खळबळ

IPS officer commits suicide due to caste discrimination and insults; stirs up controversy in the country

 

 

हरियाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक वाय पूरन कुमार यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी चंदीगडमध्ये सेक्टर-11 येथील घरात स्वत:वर गोळी झाडली.

सरकारचा निर्णय;मुलांच्या आणि मुलींच्या स्वतंत्र शाळांचे विलीनीकरण

पोलिसांना पूरन सिंह यांचं मृत्यूपत्र आणि 9 पानी सुसाइट नोट मिळाली. सुसाइड नोटमध्ये पूरन सिंह यांनी त्यांच्या मृत्यूपत्राचा उल्लेख केला आहे.

 

त्यांनी सर्व संपत्ती पत्नी अमनीत कुमार यांच्या नावावर केली आहे. अमनीत कुमार सुद्धा IAS अधिकारी आहेत. पूरन कुमार यांची पत्नी अमनीत यांनी डीजीपी हरियाणा शत्रुजीत सिंह कपूर आणि एसपी रोहतक नरेंद्र बिजारणिया यांच्यावर

धनुष्यबाण कोणाचे ? सर्वोच्च न्यायालयात पुन्हा तारीख पे तारीख

त्यांच्या पतीचा मानसिक छळ, जाती-आधारीत भेदभाव आणि त्रास दिल्याचा आरोप केला आहे. माझ्या पतीला जाती सूचक शिव्या दिल्या असाही अमनीत यांचा आरोप आहे. पोलीस या सर्व आरोपांची चौकशी करत आहेत.

 

दिवंगत IPS पूरन कुमार यांनी सुसाइट नोटमध्ये लिहिलय की, “मी पूर्ण शुद्धीत आणि स्वतंत्र इच्छेने जाहीर करतो की, माझ्या नंतर माझी पत्नी श्रीमती अमनीत पी कुमार माझ्या सर्व चल, अचल संपत्तीची मालक असेल. ही माझी स्वतंत्र, अंतिम इच्छा आहे. पूर्ण शुद्धीत मी हे जाहीर करतोय”

मराठवाड्यातील शिंदेंचे मंत्री संकटात? चौकशी सुरू

पोलिसांना जी सुसाइड नोट मिळाली, त्यात पूरन कुमार यांनी त्यांना झालेल्या त्रासाबद्दल सविस्तरपणे लिहिलय. “हरियाणामध्ये काही वरिष्ठ अधिकारी 2020 पासून माझ्याबरोबर जाती आधारित भेदभाव करत होते.

 

मानसिक छळ, सार्वजनिक अपमान आणि अत्याचाराने मी त्रस्त आहे. माझ्यासाठी हे सर्व सहन करण्यापलीकडे गेलय” असं लिहिलय.

 

बिहार विधानसभा; प्रशांत किशोरांच्या पहिल्याच यादीत एनडीए, महाआघाडीसह राजकीय जाणकारांना चकवा
“माझ्या विरोधात अनेक प्रकारच्या तक्रारी पेरल्या जात असून प्रचार केला जात आहे. त्यावरुन वरिष्ठ अधिकारी सार्वजनिकरित्या मला अपमानित करतात. माझ्या प्रतिष्ठेच नुकसान करण्यात ते कुठलीही कमतरता ठेवत नाहीत”

 

असं त्यांनी लिहिलय. आपल्या सुसाईड नोटमध्ये पूरन कुमार यांनी 15 सेवारत आणि माजी IAS-IPS अधिकाऱ्यांवर सार्वजनिक रित्या भेदभावाची वागणूक दिल्याचा आणि अपमानित केल्याचा गंभीर आरोप केलाय.

 

महाराष्ट्र पुत्र थेट बिहार च्या निवडणुकीत ते हि थेट दोन-दोन मतदारसंघात मैदानात
पूरन कुमार यांनी सुसाइड नोटमध्ये आरोप केला की, त्यांचे बॅचमेट मनोज यादव, पी.के. अग्रवाल आणि टी.वी.एस.एन. प्रसाद यांनी मिळून जातीवरुन त्यांचा छळ केला. त्यांना लिहिलय की, या बद्दल मी तत्कालिन गृहमंत्र्याकडे तक्रार केली होती. पण कुठलही ठोस पाऊल उचललं नाही.

 

 

Related Articles