उद्यापासून वादळी पावसाचा इशारा ; हवामान विभागाची माहिती
Warning of stormy rain from tomorrow; Information from the Meteorological Department
‘शक्ती’ चक्रीवादळाचा परिणाम राज्यावर जाणवला नसला तरी नैऋत्य मान्सूनने राज्यातून निरोप घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात काही अंशांनी वाढ झाली असून
आता ऑक्टोबर हिटचा परिणाम जाणवू लागला आहे. मात्र बुधवारपासून पुढील चार दिवस वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
बड्या नेत्याने दिल्लीत जाऊन घेतली अमित शहांची भेट; राजकीय चर्चांना उधाण
महाराष्ट्रासह इतर काही राज्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत नैऋत्य मान्सून परतण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. बुधवार ते शनिवारपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आभाळी हवामान
आणि दुपारनंतरचा वादळी पाऊस अपेक्षित आहे. पावसाचा परिणाम शेतीवर होत असल्याने शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावे
मुख्यमंत्री म्हणतात निवडणुकीत युती तर त्यांचे मंत्री म्हणतात युती नाही झाली तर पाडापाडी
आणि काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहेत.
सध्याच्या अंदाजानुसार, वादळी पावसाची सर्वात अधिक शक्यता आणि प्रमाण हे विदर्भ आणि मराठवाड्यात असू शकते. तुलनेत खान्देश आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो.
बुधवारी कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश आणि विदर्भातील बहुतांश भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
गुरुवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना,
ऑनलाईन सर्व्हिसच्या नावाखाली बँक खात्यातून 4 लाख 65 हजार गायब
परभणीसह संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील नागपूर, वाशिम, बुलढाणा, अमरावती, अकोला या जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे काढणी केलेली धान्ये, कडधान्ये आणि फळपिके सुरक्षित ठिकाणी ठेवातीत.
दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
शेतातील पीके झाकण्यासाठी ताडपत्री, प्लास्टिकचा वापर करावा, पिकांना झाडांना आधार द्यावा, पिकांचे वाऱ्यापासून संरक्षण करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.







