राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हेलिकॉप्टरची मोठी दुर्घटना थोडक्यात टळली;पाहा VIDEO

President Draupadi Murmu's helicopter narrowly avoided a major accident; watch VIDEO

 

 

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू केरळ दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांच्यासोबत एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. पत्तनामथिट्टाच्या प्रमदम स्टेडियमच्या हॅलिपॅडवर राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरच लँडिंग होताच ते थोडं आत रुतलं.

 

एअरफोर्सच्या हेलिकॉप्टरच्या वजनाने हॅलिपॅडचा एक भाग जमिनीत रुतला. कुठली मोठी घटना झाली नाही. तिथे तैनात असलेले पोलीस आणि फायर डिपार्टमेंटच्या लोकांनी हेलिकॉप्टरला रुतलेल्या भागातून बाहेर काढलं.

20, 21, 22 ते 25 ऑक्टोंबरला हवामान विभागाचा मोठा इशारा, प्रशासन अलर्ट मोडवर

याचा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. यात रुतलेल्या हेलिकॉप्टपरला बाहेर काढण्यासाठी जोर लावला जात असल्याचं दिसतं.

इंटरनेट पडलं बंद, ऐन दिवीळीत नेटकरी हैराण

ज्या हॅलिपॅडवर ही दुर्घटना घडली तो नवीन आहे. हेलिकॉप्टरने हॅलिपॅडवर लँडिंग केल्यानंतर खड्डे बनले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, शेवटच्या क्षणी हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी स्टेडियमची निवड करण्यात आली होती.

 

म्हणून मंगळवारी रात्री तिथे हॅलिपॅड बनवण्यात आलं. आधी राष्ट्रपतींच विमान पंबा जवळ निलक्कल येथे उतरवण्याची योजना बनवण्यात आलेली.

राज्यात भीषण अपघातात 2 दिवसात 5 जण ठार,नवरीचाही मृत्यू

पण खराब हवामानामुळे हॅलिकॉप्टर इथे उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. काँक्रीट घट्ट बसलं नव्हतं. त्यामुळे हॅलिकॉप्टरने लँडिंग करताच हॅलिपॅडला वजनाचा भार सहन करता आला नाही. चाकांमुळे तिथे खड्डे बनले.

 

राष्ट्रपती मुर्मू 21 ऑक्टोंबर रोजी केरळ तिरुवनंतपूरम येथे पोहोचलेल्या. आज त्यांचा शबरीमाला मंदिरात जाण्याचा प्लान आहे.

लाडकी बहीण योजनेत 164 कोटींचा दरोडा? सरकार वसुली करणार का

त्यानंतर गुरुवारी त्या तिरुवनंतपुरम येथील राजभवनात माजी राष्ट्रपती केआर नारायणन यांच्या प्रतिमेचं अनावरण करतील. वर्कला येथे शिवगिरी मठ येथे श्री नारायण गुरुंच्या महासमाधी शताब्दी समारोहाच उद्घाटन करतील.

 

त्या शिवाय राष्ट्रपती कोट्टायम जिल्ह्यात पाला येथील सेंट थॉमस कॉलेजच्या 75 वर्ष पूर्ण होण्याच्या सांगता समारंभात सहभागी होतील.

 

24 ऑक्टोंबरला त्या एर्नाकुलम येथील सेंट टेरेसा कॉलेजच्या शताब्दी सोहळ्यात सहभागी होतील. त्यानंतर त्यांचा केरळ दौरा समाप्त होईल.

 

Related Articles