24 तासांत सोन्याचा भाव सहा हजारांनी कोसळला

Gold price falls by 6,000 in 24 hours

 

 

गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात सहा हजार रुपयांची घट होऊन ते 133000 वरून 127000 इतके खाली आले आहेत, तर चांदीच्या दरात सात हजार रुपयांची घसरण होऊन ते 169000 वरून 164000 झाल्याने, दिवाळी पाडव्याच्या दिवशी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी ) केली असल्याच पाहायला मिळत आहे.

आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका;नेत्याचे खळबळजनक विधान

गेल्या महिनाभरामध्ये सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी दर वाढ झाल्याने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सर्व सामान्य जनतेसाठी सोने खरेदी करणे मोठे अवघड झाले होते. मात्र गेल्या चोवीस तासात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात सहा हजार रुपयांची मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाल्याने पाडव्याच्या मुहूर्तावर जळगाव सुवर्ण नगरीत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचं पाहायला मिळत आहे.

 

 

सध्या सोन्याच्या दरात घसरण होण्याच्या मागे सट्टा बाजारातील नफेखोरीमुळे ही तात्पुरती घसरण झाली असल्याची माहिती समोर आली आहे, तरी आगामी काळात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता सुवर्ण व्यावसायिक यांनी व्यक्त केली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचे दर जीएसटीसह सोन्याचे दर 135000 पर्यंत गेले होते, आता ते 129000 वरती आले आहेत, आठवडा भरात सोन्याचे आणि चांदीचे दर रोज कमी जास्त होत असल्याचं दिसून आले आहे.

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हेलिकॉप्टरची मोठी दुर्घटना थोडक्यात टळली;पाहा VIDEO

आठवड्याभराचे सोन्याचे दर
१६ ऑक्टोबर – १ लाख २७ हजार ७००
जीएसटीसह – १ लाख ३१ हजार ५३१

१७ ऑक्टोबर – १ लाख ३१ हजार
जीएसटीसह – १ लाख ३४ हजार ९३०

 

 

१८ ऑक्टोबर – १ लाख ३१ हजार
जीएसटीसह – १ लाख ३४ हजार ९३०

१९ ऑक्टोबर – १ लाख २८ हजार
जीएसटीसह – १ लाख ३१ हजार ८४०

 

लाडकी बहीण योजनेत 164 कोटींचा दरोडा? सरकार वसुली करणार का

२० ऑक्टोबर – १ लाख २७ हजार २०० रुपये
जीएसटीसह – १ लाख ३१ हजार १६ रुपये

२१ ऑक्टोबर – १ लाख ३० हजार ५०० रुपये
जीएसटीसह – १ लाख ३४ हजार ४१५ रुपये

 

 

२२ ऑक्टोबर – १ लाख २९ हजार रुपये
जीएसटीसह – १ लाख ३२ हजार ८७० रुपये

२३ ऑक्टोबर – १ लाख २३ हजार रुपये
जीएसटीसह – १ लाख २६ हजार ६९० रुपये

 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीची युती नाही ;फॉर्म्युला ठरला

तर आज गुरुवारी देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याच्या किमतीत किंचित वाढ झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ५ डिसेंबरची एक्सपायरी डेट असलेला सोन्याचा वायदा आज (गुरुवार, २३ ऑक्टोबर) प्रति १० ग्रॅम १,२२,३०० वर उघडला. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, एमसीएक्सवर सोन्याचा भाव १,२१,८५७ वर बंद झाला, जो ४४३ ची वाढ दर्शवितो.

 

आज (गुरुवार, २३ ऑक्टोबर) सकाळी ११:१५ वाजता, ५ डिसेंबरची एक्सपायरी डेट असलेले सोने एमसीएक्सवर १,२२,९६३ वर व्यवहार करत होते, जे मागील दिवसाच्या बंद किमतीपेक्षा जवळजवळ १,००० ने जास्त होते. सुरुवातीच्या व्यवहारात एमसीएक्स गोल्डने १,२३,०७४ चा उच्चांक गाठला होता.

ट्रम्प यांच्या निर्णयाने पुण्यात मोठा भूकंप येणार?

एमसीएक्सवरही चांदीच्या किमती वाढत आहेत. ५ डिसेंबरची एक्सपायरी डेट असलेले चांदीचे करार २३ ऑक्टोबर रोजी १४७,७९९ वर उघडले. तर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास, चांदी १४७,०९९ वर व्यवहार करत होती. सोन्या-चांदीच्या किमतीतील ही वाढ भारत-अमेरिका व्यापार चर्चेशी जोडली जात आहे. येत्या काही दिवसांत दोन्ही देशांमधील व्यापार करार होण्याची आशा आहे, ज्यामुळे अमेरिकेच्या जड शुल्कापासून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

 

दिल्लीतील सोन्याची किंमत (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – १,२६,०३०
२२ कॅरेट – १,१४,८००
१८ कॅरेट – ९४,५६०

मुंबईत सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – १,२५,०८०
२२ कॅरेट – १,१४,६५०
१८ कॅरेट – ९३,८१०

 

 

आधार कार्ड अवैध ठरल्याने ५ लाख ७८ हजारहून अधिक विद्यार्थी शालाबाह्य

गेल्या काही वर्षांत सोन्याने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. म्हणूनच लोक सोने आणि चांदीकडे आकर्षित होत आहेत. गुंतवणूकदार सोने आणि चांदीला सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानतात. जगभरात चांदीची मागणी झपाट्याने वाढली आहे. अलिकडेच भारतात चांदीचा तुटवडा निर्माण झाला होता. जास्त मागणी आणि कमी पुरवठ्यामुळे चांदीचे भाव गगनाला भिडत आहेत.

 

 

 

Related Articles