पाहा VIDEO ;हरियाणानंतर बिहारमध्येही मतचोरी होणार! थेट पुरावे दाखवत राहुल गांधीचा गंभीर आरोप

After Haryana, there will be vote rigging in Bihar too! Rahul Gandhi makes serious allegations, showing direct evidence

 

 

लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्रातील मोदी सरकारवर मतचोरीचे गंभीर आरोप केले आहेत.

 

ऑगस्ट महिन्यात त्यांनी कर्नाटकातील महादेव पुरा मतदारसंघात झालेल्या मतचोरीचा मुद्दा उपस्थित करत केंद्र आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी आपण हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा दिला होता. राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत हरियाणा निवडणुकीत झालेल्या मतचोरीचे खुलासे केले आहेत.

राज्यात भीषण अपघातात 2 दिवसात 5 जण ठार,नवरीचाही मृत्यू

“कर्नाटकातील महादेवपुरानंतर हा मतचोरीचा मुद्दा आहे. तो एका राज्यात किंवा जिह्यात होत नाहीये तो संपूर्ण देशात सुरू आहे. एक्झिटपोलनुरसार हरियाणात काँग्रेसचे सरकार येणार असल्याचे दाखवत होते.

 

आमचा डेटा, पक्ष हेदेखील काँग्रेसच्या बाजूने कल देत होते. पहिल्यांदाचा पोस्टल बॅलेट्स आणि राज्याचे निकाल वेगवेगळे होते. पोस्टल बॅलेटनुसार काँग्रेस पुढे होती. ओपीनियन पोल, एक्झिट पोल यासर्वात काँग्रेस पुढे होती. पण निकाल काही वेगळेच आले. आम्ही खोलवर चौकशी केली. ”

 

बस चालकाने चक्क शिवीगाळ करत कानशिलात लगावली
आम्हाला एक उत्तर मिळाले, सरकार एक ऑपरेशन करत आहे. मतांची चोरी करण्यात आली होती. हरियाणात काँग्रेसचा विजय होता तो पराभवात बदलण्यात आला. यावेळी राहुल गांधी यांनी भाजपच्या एका नेत्याचे पत्रकार परिषदेतील काही फुटेज दाखवले त्यात हा नेता हरियाणात भाजप एकतर्फी सरकार बनवत असल्याचे म्हणताना दिसत आहे.

 

आमच्याकडे सर्व व्यवस्था आहे. राहुल गांधी म्हणाले, जर सगळे एक्झिट पोल, ओपीनियन पोल काँग्रेस जिंकत असल्याचे म्हणत आहेत आणि हे हसत हसत सांगता आहेत की आमच्याकडे सर्व व्यवस्था आहेत. मग भाजपकडे अशा कोणत्या व्यवस्था आहेत, असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीची युती नाही ;फॉर्म्युला ठरला

हा हरियाणाचा अंतिम इलोक्टोरल नकाशा आहे. हरियाणात काँग्रेस जवळपास २२ हजार मतांनी हरली. ८ मतदारसंघात पराभव झाला. ही यादी आहे. पण मतांचा फरक जोडला असता ८ मतदारसंघात २२ हजार मते जोडली असती तर काँग्रेसचा विजय झाला असता. पण जर एकूण मतांची आकडेवारी पाहिली तर १.१६ लाख मतांचे अंतर होते. १ लाख आणि २२ हजार,हा आकडा लक्षात ठेवा.

 

राहुल गांधी यांनी एका तरुणीचा फोटो स्क्रीनवर शेअर केला. ते म्हणाले या तरूणीने २२ वेळा १० मतदान केंद्रावर मतदान करण्याची संधी मिळते. राय मतदारसंघात २२ वेळा १० मतदान केंद्रांवर या तरूणीला मतदान करण्याची संधी मिळते.

 

ही तरूणी ब्राझीलची मॉडेल आहे. म्हणजेच हे केंद्रीय ऑपरेशन आहे. कारण १० मतदान केंद्रावर हीचा फोटो आहे. म्हणजे हे BLOचे काम नाही. हे सेंटरमधून डेटाबेसमध्ये टाकण्यात आले आहे. ब्राझीलची महिला २२ वेळा हरियाणात मतदान करते.

राज ठाकरें म्हणाले;’निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद बघून तळपायाची आग मस्तकात गेली’

हरियाणात पाच पद्धतीने मतचोरी करण्यात आली आहे. डुप्लिकेट मतदार: ५२१,६१९ चुकीचा पत्ते: ९३,१७४ मोठ्या प्रमाणात मतदार: १९,२६,३५१ असे आहेत. महादेव पुरातील मतदारसंघातील प्रेझेन्टेशननंतर निवडणूक आयोगाने आम्हाला इतर फॉर्म्स दिले नाहीत. त्यावेळी त्यांनी चूक केली.

 

पण आता आम्हाला फ़ॉर्म ७ दिले नाहीत. महादेवपुरात फॉर्म ६ मध्ये ३० टक्के मतचोरी झाली होती. आता इथेही तसेच झाले असणार. फ़ॉर्म ६ आणि फ़ॉर्म ७मध्ये जवळपास १० लाख मतांची चोरी झाली असावी असा आमचा अंदाज आहे. पण आमच्याकडे त्याचे रेकॉर्ड्स नाहीत.

 

हरियाणा वासियांनो तुमचे सरकार चोरण्यात आले आहे. हरियाणात खोटे सरकार स्थापन झाले आहे. हरियाणात २ कोटी मतदार आहेत. त्यात २५ लाखांची मतचोरी झाली आहे.

सध्या जी मतचोरी सुरू आहे ती थांबवा ;शरद पवारांचा एल्गार

हरियाणात १२.५ टक्के मतचोरी झाली होती. त्यानंतरही काँग्रेस केवळ २२ हजार मतांनी हरते. एक फोटो एक मतदारसंघ १०० मते. एकाच महिला फोटोपुढे वेगवेगळी नावे, असे करण्यात आले.

 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या कथित मतदार गैरव्यवहारांबाबत निवडणूक आयोगावर तीव्र आरोप केले आहेत. “एका बूथवर त्याच महिलेचे नाव तब्बल २२३ वेळा आल्याचे दिसून आले आहे. त्या महिलेने किती वेळा मतदान केले, याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे,” असे ते म्हणाले.

 

246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणूक;2 डिसेंबरला मतदान 3 डिसेंबरला मतमोजणी

राहुल गांधी म्हणाले की, “सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यात आले कारण त्यातून बूथवरील गैरव्यवहार उघड झाले असते. एका मुलीने १० ठिकाणी मतदान केले,

 

तर बनावट फोटो असलेले १,२४,१७७ मतदार होते. एका महिलेने नऊ ठिकाणी मतदान केल्याची नोंद आहे. या सर्व प्रकारामागे भाजपला मदत करण्याचा हेतू असल्याचा आरोप केला. तसेच, या मतचोरीची चौकशी आता जनतेनेच केली पाहिजे.” असे आवाहनही त्यांनी केले.

 

 

लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यांनी पुन्हा एकदा मतदार याद्यांमधील घोळ समोर आणून निवडणूक आयोगाची गोची केली.

फडणवीसांकडून कॉन्ट्रॅक्टरची खरडपट्टी

देशामध्ये राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर मतांची चोरी होत आहे. त्यांनी निवडणूक आयोग (ECI) आणि भारताच्या लोकशाही प्रक्रियेवर १००% पुराव्यांसह प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्याचबरोबर एका ब्राझीलच्या मॉडेलने हरयाणामध्ये 22 वेळा मतदान केल्याचा धक्कादायक दावा राहुल गांधींनी केला आहे.

 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत कथित मतांची चोरी वैयक्तिक मतदारसंघांमध्ये नाही तर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर होत असल्याचे सांगितले. सर्व सर्वेक्षणांनी हरियाणामध्ये काँग्रेसचा विजय दर्शविला होता, परंतु त्याचा परिणाम असा झाला की काँग्रेसचा हरियाणा निवडणुकीत फक्त २२,७७९ मतांनी पराभव झाला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची मोडली, जागेवरच खाली

राहुल गांधी यांनी दावा केला की हरियाणामध्ये एकूण २५ लाख म्हणजेच १२.५% मते चोरीला गेली. त्याचबरोबर ब्राझीलच्या मॉडेलचे फोटो दाखवून हरयाणामध्ये 22 वेगवेगळ्या ठिकाणी मतदान झाल्याची धक्कादायक बाब समोर आणली आहे.

 

राहुल गांधी म्हणाले की, “हरियाणात आम्ही सखोल चौकशी केली. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि हरियाणात मत चोरी झाल्याचा दावा त्यांनी पुन्हा केला. या पत्र परिषदेत त्यांनी एका मुलीचा फोटो दाखवला. ती ब्राझिलयन मॉडेल असून तिच्या फोटोच्या आधारे विविध नावावर 22 ठिकाणी मतदान झाल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.

मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात 48 नगरपरिषदा अन् 11 नगरपंचायतींसाठी निवडणूक

या मॉडेलच्या नावावर 22 मतदार ओळखपत्र समोर आल्याचा दावा त्यांनी केला. तिचे नाव कधी सीमा तर कधी स्वीटी असल्याचा दावा त्यांनी केला. 10 वेगवेगळ्या बूथवर तिने 22 वेळा मतदान केलं आहे.” असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

 

मॉडेलचा फोटो दाखवत राहुल गांधी यांनी सांगितले की, “10 बुथवर 22 वेळा मतदान केले. प्रत्येक वेळी नावात बदल करण्यात आला. एकाच मॉडेलच्या फोटोवर विविध नावांआधारे 22 वेळा मतदान केले.

 

हरियाणात जे 25 लाख मत चोरी झाली, त्यात हा एक मोठा घोटाळा असल्याचा दावा त्यांनी केला. वोट चोरी, मत चोरी हे 5 श्रेणीत करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. 5,21,619 बोगस मतदार आहे. 93,174 पत्ते बोगस आहेत. 19,26,351 एकगठ्ठा मतदार आहे. फॉर्म 6 आणि 7 चा मोठा गैरवापर झाला. हा एक केंद्रीय कट असल्याचा आरोप त्यांनी केला.”

 

VIDEO;न्यू यॉर्कच्या महापौरपदी ममदानी यांचा विजय ;विजयी भाषणात ‘धूम मचाले’चा जलवा
हरयाणा विधानसभा निवडणुकीमध्ये ठरवून कॉंग्रेसचा पराभव केला असल्याचा दावा राहुल गांधींनी केला. ते म्हणाले की, “हरियाणात एक्झिट पोलमध्ये काँग्रेसचा विजय दाखवत होते. तर हरियाणाच्या इतिहासात पहिल्यांदाच पोस्टल मतदान आणि वास्तविक मतदानात मोठा फरक दिसला.

 

हरियाणात यापूर्वी असे कधीच दिसले नाही. त्यामुळे आम्ही खोलात जाऊन चौकशी करण्याचे ठरवले. मी निवडणूक आयोग आणि भारताची लोकशाही प्रक्रियेवर मी त्यामुळेच सवाल उभे करत आहे. हे हवेतील आरोप नाही तर त्यासाठी 100% पुरावे सादर करत आहे.

जोपर्यंत कर्जमाफी नाही, तोपर्यंत सरकारला मत देणार नाही असे बोर्ड लावा;उद्धव ठाकरे

मला खात्री आहे की काँग्रेसच्या महाविजयाचे रुपांतर पराभवात करण्याची योजना आखण्यात आली,” असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

 

 

 

 

Related Articles