राहुल गांधींना कार्यक्रमाला पोहचले उशीरा; सर्व कार्यकर्त्यांसमोरच मिळाली शिक्षा

Rahul Gandhi reached the event late; got punished in front of all the workers

 

 

कॉंग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे जोरदार चर्चेमध्ये आले आहेत. मध्य प्रदेशमध्ये राहुल गांधी दौऱ्यावर गेले आहेत. मात्र त्यांच्या या दौऱ्यावेळी राहुल गांधी यांच्याकडून पक्षाची शिस्तबंद झाल्याचा प्रकार घडला आहे.

 

राहुल गांधी हे स्वतः पक्षाच्या कार्यक्रमाला उशीरा पोहचले. त्यामुळे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी या कृत्याबाबत स्वतःला शिक्षा दिली आहे. राहुल गांधी यांचा या शिक्षेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अब्दुल सत्तार यांनी दिल्या आमदार निधीतून स्वत:च्याच शिक्षण संस्थेला 32 लाखांच्या रुग्णवाहिका

मध्य प्रदेशातील पंचमढीमध्ये आयोजित काँग्रेस जिल्‌हा अध्यक्षांच्या प्रशिक्षण सत्रादरम्यान उशीर करणाऱ्यांना अनोखी शिक्षा देण्याचा पायंडा पाडला होता.

 

उशिरा येणाऱ्याचे स्वागत टाळ्या वाजून त्यांना ‘टाईम मॅनेजमेंट’ महत्व कळावे आणि प्रतिकात्मक शिक्षाही दिली जात होती. याच ठिकाणी राहुल गांधी स्वतःच २० मिनिटे उशिरा पोहचले.

महायुतीत पहिली मोठी फुट

त्यामुळे स्वतः राहुल गांधी यांना दहा पुशअप्सची शिक्षा झाली. जी राहुल गांधी त्यांनी हसत स्वीकारली. सोशल मीडिया राहुल गांधी यांचा पुश अप करतााना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ही शिक्षा स्वीकारल्यामुळे राहुल गांधी यांचे कॉग्रेस नेत्यांकडून कौतुक केले जात आहे.

 

वृत्तसंस्थेशी बोलताना मध्य प्रदेश काँग्रेसचे मीडिया समन्वयक अभिनव बरोलिया म्हणाले, “आमचे नेते राहुलजी यांच्यासाठी हे काही नवीन किंवा आश्चर्यकारक नाही. आमच्या गटात आम्ही शिस्तीचे काटेकोरपणे पालन करतो.

अमेरिकेच्या कंपन्यांमुळे भारतावर मोठं संकट

पक्षात लोकशाही आहे जिथे सर्वांना समान आणि समान वागणूक दिली जाते. आमच्या पक्षात भाजपसारखा ‘बॉसिझम’ (बॉसगिरी) नाही.” अशी भूमिका कॉंग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे.

 

राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशमध्ये भाषण करताना भाजपवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी भाजपकडून कायमच मतचोरी केली जात असल्याचा आरोप केला. राहुल गांधी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी मी हरियाणा मॉडेल सादर केले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची मोडली, जागेवरच खाली

२५ लाख मतांची चोरी झाल्याचं दाखवून दिलं. प्रत्येक आठ मतदारांपैकी एकाचं मत चोरलं होते. ही यांची व्यवस्था आहे. मुख्य मुद्दा ‘व्होट चोरी’ आहे. आमच्याजवळ पुरावे आहेत आणि आम्ही एक- एक करुन जाहीर करणार आहोत, असा आक्रमक पवित्रा राहुल गांधींनी घेतला आहे.

 

 

तथापि, मध्य प्रदेशात भाजपकडूनही राहुल गांधींवर हल्ला होत आहे. शनिवारी राहुल गांधींनी जंगल सफारीचा आनंद घेतला हे लक्षात घ्यावे. त्यानंतर मध्य प्रदेश सरकारचे मंत्री विश्वास सारंग म्हणाले की,

जोपर्यंत कर्जमाफी नाही, तोपर्यंत सरकारला मत देणार नाही असे बोर्ड लावा;उद्धव ठाकरे

राहुल गांधी राजकारण गांभीर्याने घेत नाहीत. ते म्हणाले की, बिहारसारख्या राज्यात निवडणुका होत असताना, ते मध्य प्रदेशात जंगल सफारीचा आनंद घेत आहेत. यामुळे भाजप नेत्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

 

 

Related Articles