महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित हवेचे ही १७ शहरे

These 17 cities in Maharashtra have the most polluted air

 

 

राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये धूलिकणांची (पार्टिक्युलेट मॅटर – PM) पातळी राष्ट्रीय मर्यादेपेक्षा (National Standards) जास्त असून, विशेषतः मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. ‘

 

एन्वारोर्केटलिस्ट’ आणि ‘वातावरण फाऊंडेशन’ यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) गेल्या आठ वर्षांच्या आकडेवारीवर आधारित संयुक्त अहवाल नुकताच सादर केला आहे.

राजकारणात खळबळ;अजित पवारांच्या पक्षाचेच मंत्री म्हणाले ,अजित पवारांना राजीनामा द्यावा लागेल

या अहवालानुसार, वायू प्रदूषणाच्या संकटात महाराष्ट्रातील सर्व शहरांचा समावेश झाल्याने मोठी चिंता व्यक्त होत आहे. महाराष्ट्रातील १७ शहरांनी PM 2.5 ची राष्ट्रीय मर्यादा (४० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर) ओलांडली आहे आणि सर्व शहरांमध्ये PM 10 ची पातळी ‘राष्ट्रीय वातावरणीय वायू गुणवत्ता मानकांपेक्षा अधिक आहे.

 

 

मुंबईतील पातळी: मुंबईत PM 2.5 पातळी ३५ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर आणि PM 10 पातळी ९१ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर नोंदवली गेली आहे. जरी ही पातळी राष्ट्रीय मर्यादेत असली तरी, ती जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मानकापेक्षा सातपट जास्त आहे.

अजितदादांनी उपुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत होते ,मोठ्या नेत्याचा दावा

उपाययोजनांचा अभाव: ‘राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम’ (NCAP) अंतर्गत मंजूर निधीचा मर्यादित वापर आणि स्थानिक पातळीवरील नियोजनाचा व समन्वयाचा अभाव यामुळे प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत असल्याचे अहवालात नमूद आहे.

 

हिवाळ्यातील धोका: या सर्व शहरांमध्ये हिवाळ्यात प्रदूषणाचे प्रमाण झपाट्याने वाढून नागरिकांच्या आरोग्याला गंभीर हानी पोहोचवते.

मतदार यादीत फोटो आल्यानंतर काय म्हणाली ब्राझीलची मॉडेल लारिसा ?

MMR मधील शहरांची धोकादायक स्थिती
ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, कल्याण, उल्हासनगर, विरार आणि बदलापूर या MMR मधील शहरांची परिस्थितीही धोकादायक आहे:

 

नवी मुंबई: येथे PM 10 पातळी १०२ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरपर्यंत पोहोचली असून, गेल्या पाच वर्षांत यात सुमारे दुप्पट वाढ झाली आहे.

ठाणे: PM 2.5 प्रदूषक ३८ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर, तर PM 10 हे ८३ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर नोंदवले गेले आहे. बांधकाम आणि वाहतुकीतील धूळ हे प्रमुख कारणे आहेत.

उपमुख्यमंत्री शिंदें अण्णा हजारेंना का भेटले ?‘हे’ कारण आले समोर
उपनगरांमधील वाढ: मीरा-भाईंदर आणि विरारमध्ये PM 2.5 हे ४० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरपेक्षा जास्त झाले असून, उपनगरांतील हवा महानगराइतकीच प्रदूषित असल्याचे स्पष्ट होते.

अति धोका: बदलापूर, भिवंडी आणि बेलापूरमध्ये PM 10 पातळी १०० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरपेक्षा जास्त झाली असून, हिवाळ्यात प्रदूषणाची पातळी धोकादायक पातळीवर पोहोचते.

माझ्या हत्येचा कट धनंजय मुंडेंनी रचला , जरांगे पाटलांनी ऐकवली धनंजय मुंडेंची ऑडिओ क्लिप
उपाययोजनांची वेळ आली आहे
‘एन्वारोकॅटलिस्ट’चे संस्थापक सुनील दहिया यांनी इशारा दिला आहे की, महाराष्ट्रातील बहुतेक शहरांमध्ये धूलिकणांची पातळी धोकादायक आहे. आता ‘राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाच्या’ मर्यादेपलीकडे जाऊन प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना कठोरपणे राबवण्याची वेळ आली आहे.

 

अहवालातील मुख्य शिफारसी:

जास्त प्रदूषित, पण ‘नॉन-NCAP’ शहरांचा कार्यक्रमात तातडीने समावेश करणे.
हिवाळ्यापूर्वी अनिवार्य ‘हंगामी कृती आराखडा’ लागू करणे.
निधीचे वितरण कामगिरीच्या आधारे करणे.

लाच घेताना तलाठीला रंगेहात अटक

हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्रांचा विस्तार करणे.
बांधकाम, वाहतूक, कचरा व्यवस्थापन आणि औद्योगिक उत्सर्जन नियंत्रणासाठी समन्वय वाढवणे.

 

 

Related Articles