मराठवाड्यातील अजित पवार गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविकेचा अचानक मृत्यू

A newly elected corporator from the Ajit Pawar group in Marathwada has died suddenly.

 

 

 

नवनिर्वाचित नगरसेविकेच्या मृत्यूने परिसर आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. पहाटे नगरसेविकेची अचानक प्रकृती खालावली म्हणून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

भाजपमधून माजी महापौरांसह 54 जणांची हकालपट्टी

पण पहाटेची वेळ असल्यामुळे त्यांच्यावर वेळेत उपचार झाले नाहीत आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जवळ पैसे नसताना त्यांनी मोठ्या जिद्दीने निवडणूक लढवली आणि विजय देखील मिळवला. जनतेचं त्यांच्यावर असलेल्या विश्वासामुळे हे शक्य झालं. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं.

 

शिंदेंचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले,दादागिरी हा आमचा धंदा
ज्या नगरसेविकेचं निधन झालं आहे, त्यांचं नाव शाहूताई कांबळे असं होतं. लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर येथील नवंनिर्वाचित नगरसेविका शाहूताई कांबळे यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

 

छातीत दुखत असल्याने त्यांना अहमदपूरच्या रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्या तिथे त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. शाहूताई कांबळे यांनी नुकताच झालेल्या नगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाकडून निवडून आल्या होत्या.

दोन लाखांची लाच,दोन फौजदार अँटी करप्शन चा ट्रॅप , गुन्हा दाखल होताच पसार

मंगळवारी म्हणजे आज पहाटे अचानक शाहूताई यांच्या छातीत वेदना होऊ लागल्या. म्हणून कुटुंबियांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं.

 

पण पहाटेची वेळ असल्यामुळे शहरातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये डॉक्टर उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर वेळेत उपचार झाले नाहीत.

 

अखेर त्यांना ग्रामीन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना जर जवळपास 20 मिनिटांपूर्वी उपचार मिळाले असते, तर त्यांचे प्राण वाचले असते.. असं देखील सांगण्यात येत आहे.

अजित दादा परभणीत आले आणि नेहमीचे विकासाचे तुणतुणे वाजवून गेले

दरम्यान, नगरसेविका शाहूताई कांबळे यांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना मोठा धक्का बसला. बाबासाहेब पाटील म्हणाले, ‘पक्षासाठी आणि माझ्यासाठी हा फार मोठा धक्का आहे.’ शाहूताई कांबळे यांच्या जाण्याने संपूर्ण प्रभागात शोककळा पसरली आहे.

 

दिवंगत नगरसेविका शाहूताई कांबळे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, 2017 मध्ये त्यांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. फक्त 12 मतांनी त्यांनी हार मानावी लागली.

पायलटसह 6 जण असलेल्या चार्टर्ड विमानाचा भीषण अपघात

पण जनतेचा त्यांच्यावर विश्वास होता आणि याच विश्वासाच्या जोरावर त्यांनी निवडणूक लढवली आणि वियज मिळवला. या प्रवासात बाबासाहेब पाटील यांची मोठी साथ शाहूताई कांबळे यांना लाभवी. पण त्यांच्या निधनानंतर आता सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

 

 

Related Articles