बापरे..! आता सरकार परस्पर नागरिकांच्या खात्यावरून पैसे काढून घेणार

Oh my god..! Now the government will withdraw money directly from citizens' accounts.

 

 

नवा नियम, कठोर नियम. असं काही म्हटलं की नागरिकांना धडकीच भरते. शासनाकडून लागू केल्या जाणाऱ्या नियमांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम हा कायमच सामान्यांवर होत असतो आणि या नियमांच्या परिणामांचा सामनाही याच सामान्यांना करावा लागतो.

 

ज्यामुळं शासन नियमांबाबत नागरिकांच्या मनातही काहीशी भीती असते. असाच एक काहीसा चिंतेत टाकणारा नियम लागू करण्याचा विचार राज्य शासन करत असून, रस्ते वाहतुकीमध्ये सुसूत्रता आणक वाढत्या अपघातांचा आकडा कमी करण्यासाठी म्हणून हे नियम लागू केले जाण्याची शक्यता आहे.

 

महापालिका निवडणुकीच्या मतदानावर थेट बहिष्कार, मुंबईत खळबळ
वाहतूक नियमांमध्ये हदल करण्याची तयारी दाखवतानाच राज्य शासनानं एक अनपेक्षित प्रस्तावही सादर केला आहे. ज्यामुळं अनेकांना धक्काही बसू शकतो.

 

याचा सर्वाधिक फटका वाहनधारक आणि वाहन चालकांना बसणार आहे. कारण, वाहन चावलताना झालेली एक चुकही आर्थिक फटका देऊन जाणार आहे. बसला ना धक्का?

 

आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा
महाराष्ट्रातील नागरिकांनी डोकं धरण्याची गरज नाही, कारण वरील नियमाचा प्रस्ताव हा तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी याांनी मांडला असून, त्यांच्या राज्यात सध्या थेट वाहनधारकांच्या खात्यावरूनच दंडपात्र रक्कम वजा केली जाईल अशी यंत्रणा आखण्याचा विचार केला जात आहे.

 

सर्व तरतुदींना मान्यता मिळाल्यास हा कायदा तिथं लागू होणाह आहे. ज्यासाठी ‘ट्रॅफिक चलान पेमेंट ऑटो डेबिट सिस्टीम’ ही यंत्रणा सुरू होईल.

 

सदर प्रक्रियेसाठी वाहन नोंदणी करताना त्या वाहनाची मालकी असणाऱ्या व्यक्तीचं बँक खातं वाहन विभागाशी जोडलं जाणार असून झालेल्या चुकीनंतर थेट खात्यावरून रक्कम वजा होईल.

मराठवाड्यातील अजित पवार गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविकेचा अचानक मृत्यू

वाहतूक नियमांच्या उल्लंघनाची प्रकरणं फक्त तेलंगणातच नव्हे तर संपूर्ण देशभरात पाहायला मिळतात. मात्र तेलंगणा राज्य शासनाच्या मते, सायबर क्राईम, अमली पदार्थ आणि हत्यांपेक्षाही रस्ते अपघात सध्या गंभीर वळणावर आहे.

 

ज्यामुळं वाहतूक पोलीस यंत्रणा अधिक कार्यक्षम आणि कठोरपणे कारवाई करणं अपेक्षित असून, त्याचअंतर्गत ही पावलं उचलली जात आहेत.

दोन लाखांची लाच,दोन फौजदार अँटी करप्शन चा ट्रॅप , गुन्हा दाखल होताच पसार

रस्ते अपघातात जीव गमावणाऱ्यांचा आकडा मोठा असून ही बाब अतिशय गंभीर असून, त्यासाठीच दंडपात्र रक्कमेबाबतचा हा नियम येत्या काळात लागू केला जाऊ शकतो.

 

रेड्डी यांनी केलेल्या वक्तव्यामध्ये त्यांनी काही मुद्द्यांवर आपलं ठाम मत मांडलं. देशात दर मिनिटाला रस्ते अपघात होता. राज्य शासनाकडून या समस्येकडे एक गंभीर बाब म्हणून पाहिलं जात आहे,

इराणची अमेरिकेवर मोठी मात

कारण युद्धाच्या तुलनेत दुर्घटनेमध्ये जीव गमावणाऱ्यांचा आकडा अतिशय मोठा आहे. या अपघातांमध्ये लोक आपल्या मुलाबाळांनाही गमावत आहेत ज्यामुळं त्यावर काही कठोर नियम लागू करत उपाययोजना शोधल्या पाहिलेत असा आर्जवी सूर रेवंत रेड्डी यांनी आळवला.

 

 

Related Articles