पवित्र मक्का शहरात सापडलं सोन्याचं भांडार
A hoard of gold was found in the holy city of Mecca
सौदी अरेबियामधील मक्का शहरात सोन्याचा मोठा साठा सापडला आहे. सौदीची खाणकाम कंपनी मादेन (Maaden)ने याबद्दल माहिती दिली आहे.
कंपनीने सांगितले की, शोधकार्यादरम्यान सोन्याचा साठा सापडला आहे, तो सध्याच्या मंसूराह मस्सारा सोन्याच्या खाणींपासून 100 किमी पर्यंत पसरला आहे.
खनिज उत्पादन लाइन प्रॉडक्शनच्या उद्देशाने मादेनच्या या प्रोग्राम अंतर्गत सापडलेला हा पहिला साझा आहे, हा प्रोग्राम २०२२ मध्ये लॉन्च करण्यात आला आहे.
तेलाच्या साठ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सौदी अरेबियामध्ये एवढा मोठा सोन्याचा साठा सापडल्याने देशाच्या खजिन्यात आणखी भर पडणार आहे.
खाण कंपनीने सांगितले की, मंसूराह मसारा पासून 400 मीटर अंतरावर आणि त्याच्या खाली घेतलेल्या दोन रँडम ड्रिलिंग साइट्सवर 10.4 ग्रॅम प्रति टन (G/T) सोने आणि 20.6 G/T सोन्याचा उच्च दर्जाचा सोन्याचा साठा
असल्याचे संकेत मिळाले आहेत. याचा अर्थ इथे सोन्याची घनता जास्त आहे. 2024 मध्ये मंसूराह मस्साराभोवती योजनाबद्ध ड्रिलिंग वाढवण्याची कंपनीची योजना आहे.
मादेनचे सीईओ रॉबर्ट विल्ट यांनी सांगितले की कंपनीने सोने आणि फॉस्फेट उत्पादन दुप्पट करण्याची योजना आखली आहे. आखाती देशातील सर्वात मोठे खाणकाम कंपनी
मादेनची 67 टक्के मालकी ही सार्वजनिक गुंतवणूक निधी (पीआयएफ) कडे आहे. जानेवारी 2023 मध्ये, कंपनीने परदेशातील खाण मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी PIF सोबत संयुक्त उपक्रम,
मनारा मिनरल्सची घोषणा केली होती. क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या व्हिजन 2030 कार्यक्रमांतर्गत सौदी अरेबियाला तेल अवलंबित्वापासून मुक्त करण्याच्या मोठ्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे.
मादेनने आपल्या एका निवेदनात सांगितले की, हा शोध सौदी अरेबियातील खनिज संसाधनांच्या न वापरात आलेल्या क्षमतेचे महत्त्वपूर्ण प्रदर्शन आहे.
खाणकाम हा सौदीच्या अर्थव्यवस्थेचा तिसरा स्तंभ म्हणून उदयास आला आहे. जगातील सोन्याच्या उत्पादनाचा केंद्रबिंदू बनण्याची क्षमता सौदीमध्ये आहे
आणि ते आमच्या विकासाच्या धोरणाचा मोठा भाग आहे. अरेबियन शील्डमध्ये प्रचंड क्षमता आहेत, ज्यासाठी जागतिक दर्जाच्या जास्तीत जास्त शोधांची आवश्यकता आहे आणि हा शोध येत्या काही वर्षांमध्ये लागणाऱ्या अनेक शोधांपैकी पहिला शोध आहे.