३५ हजाराची लाच घेतांना पोलीस हवालदाराला अटक

Police constable arrested while accepting bribe of 35 thousand

 

 

 

नाशिक तालुका पोलीस ठाण्यांंतर्गंत विल्होळी पोलीस चौकी येथे जमा केलेला ट्रक सोडण्यासाठी पोलीस हवालदाराने एक लाखांच्या लाचेची मागणी केली.

 

 

तडजोडीअंती ३५ हजार रुपयांची लाच खासगी इसमाने हिरावाडीत (पंचवटी) स्वीकारली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना अटक केली आहे.

 

 

 

रवींद्र बाळासाहेब मल्ले या पोलीस हवालदारासह खासगी इसम तरुण मोहन तोंडी असे अटक करण्यात आलेल्या दोघा लाचखोरांची नावे आहेत.

 

 

 

नाशिक तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत विल्होळी पोलीस चौकी येथे लाचखोर पोलीस हवालदार मल्ले यांची नेमणूक होती. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार विल्होळी पोलीस चौकी येथे त्यांचा ट्रक जमा होता.

 

 

 

तो ट्रक सोडण्यासाठी लाचखोर हवालदार मल्ले याने तक्रारदाराकडे १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ७० हजार रुपये देण्याचे ठरले होते. यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

 

 

 

 

पहिले ३५ हजार रुपयांची रक्कम देण्यासाठी लाचखोर मल्ले याने तक्रारदारास खासगी इसमाकडे पाठविले. त्यानुसार पंचवटीतील हिरावाडीत असलेल्या ओम नागपूर ट्रान्सपोर्ट येथे तक्रारदाराकडून लाचेची ३५ हजारांची रक्कम तरुण तोडी याने स्वीकारली.

 

 

 

त्यावेळी सापळा रचून दबा धरून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तोडी यास अटक केली. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दुसऱ्या पथकाने लाचखोर पोलीस हवालदार रवींद्र मल्ले यास विल्होळी पोलीस चौकी येथे अटक केली.

 

 

 

 

दोघांविरोधात पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी बजावली.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *