महाविकास आघाडीचे 25 मतदारसंघांत जागावाटप झाले

Seats of Mahavikas Aghadi were distributed in 25 constituencies ​

 

 

 

 

 

लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशातच जागावाटपाचा मुद्दा चर्चेत आहे. लोकसभेच्या जागावाटपावरून इंडिा आघाडीत मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

 

 

यावरही जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या चर्चांवर त्यांनी पडदा टाकला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

इंडिया आघाडीची 2 दिवसांत बैठक पार पडेल. 25 तारखेला जागा वाटप जाहिर होईल. एकत्रित जागा वाटप बैठक त्याचं दिवशी आहे. कोणत्याही प्रकारचे वाद आमच्यात नाहीत, असं जयंत पाटील यांनी जाहीर केलं.

 

 

आज आमची सुनावणी पार पडणार आहे. समोरच्या बाजूने वेळ मागितला. जाण्याची शक्यता आहे. आज फेरसाक्ष पार पडेल का? याबाबत थोड्या वेळात कळेल.

 

 

 

शरद पवार हे सर्वांना बोलवायचे आणि निर्णय घ्यायचे प्रांताध्यक्ष म्हणून अध्यक्ष म्हणुन तटकरे यांनी दीर्घकाळ काम केलं आहे. शरद पवार यांनी एकांगी कधीही निर्णय घेतला नाही, असं जयंत पाटील म्हणालेत.

 

 

शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या सुनावणी मध्ये फरक आहे आम्ही पूर्वानुभवानुसार घटनेमध्ये काही बदल केलेले आहेत. आम्ही योग्य खबरदारी घेतलेली आहे.

 

 

अजित पवार गटाने मुदत वाढ मागितली आहे. आमच्या वकिलांनी त्यांना विरोध केला पण अध्यक्षांनी वेळ मागितला. मला वाटतं आज आमची साक्ष होईल.

 

 

अनिल पाटील हेच 2019 आमच्या पक्षात आले. त्यांना आमचा पक्ष कशा चालतो, त्यांना माहीत नाही, असंही जयंत पाटील म्हणालेत.

 

 

असंख्य मराठा आंदोलकांसोबत मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने येत आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केलं जाणार आहे. त्यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

 

मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा त्यांना वेळ वाढवून दिला होता. सरकारने वेळोवेळी आश्वासन दिली आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

 

यांनी सुद्धा आवहान केलं आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारने सोडवायला हवा, असंही मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *