संजय राऊतांनी थेट मोदींनाच दिले EVM चे चॅलेंज,म्हणाले …

Sanjay Raut directly gave the challenge of EVM to Modi, said... ​

 

 

 

 

 

उद्या अयोध्या नगरीमध्ये राममंदिर उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. हाच मुहूर्त साधत शिवसेना ठाकरे गटाकडून नाशिकमध्ये काळाराम मंदिरात दर्शन, पुजा

 

 

 

व गोदावरी काठावर महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे. यावर बोलताना संजय राऊत यांनी संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

 

 

तसेच भाजप अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याचं राजकारण करतयं, मात्र आम्ही राजकारण न करता हा सोहळा साजरा करण्याचं ठरवलंय, असे संजय राऊत म्हणालेत.

 

 

“२२ आणि २३ तारखेचे कार्यक्रम महत्वाचे आहेत. आज आम्ही सर्व कार्यक्रमांचा आढावा घेतोय, सर्व प्रमुख नेते पोहचायला लागलेत.

 

 

आम्ही उद्या काळाराम मंदिरात जाऊन आरती करणार आहोत, त्यानंतर गोदावरी तिरावर आरती करू, तसेच शरयू ची भव्य दिव्य आरती देखील आम्हीच सुरू केलीय..” असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

 

 

“उद्या बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करून अधिवेशनाला सुरुवात होईल. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे निर्णय, ठराव यात घेतले जातील.

 

 

 

ते आमच्यासाठी दिशादर्शक असेल. तसेच २३ ला संध्याकाळी उद्धव ठाकरे यांची सभा होईल, मैदानावर काही धार्मिक कार्यक्रम होतील,” अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली.

 

 

 

 

“ईव्हीएम आणि वन नेशन वन इलेक्शन सर्व फ्रॉड आहे. हे भाजपने सत्तेवर राहण्यासाठी टाकलेलं जाळ आहे. देशातून जेव्हा ईव्हीएम जाईल त्या दिवशी भाजप ग्रामपंचायतीची निवडणूक सुद्धा जिंकू शकणार नाही.

 

 

भाजपला स्वतःच्या क्षमतेवर एवढा आत्मविश्वास असेल, तर त्यांनी कोणत्यातरी एका निवडणुकीपुरतं ईव्हीएम दूर करावं,” असे थेट आव्हान राऊतांनी यावेळी दिले.

 

 

 

 

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांच्या फोटो ट्वीटलाही जोरदार प्रत्यूत्तर दिले. “आमच्याकडे देखील फोटो आहे, आम्हाला पुरावे द्यायची गरज नाही.

 

 

 

तुमच्याकडे नागपूर स्टेशनचे फोटो आहे, आमच्याकडे घुमटावरचे फोटो आहे. तुम्ही स्टेशन वर फिरायला गेले असतील,” असा टोला राऊतांनी यावेळी लगावला.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *