कुणालातरी सीएम व्हायचंय म्हणून मुख्यमंत्र्यांना विषारी पदार्थ दिले जात आहेत ;नेत्याच्या दाव्याने खळबळ

Poisonous substances are being given to the Chief Minister because someone wants to be the CM; the leader is excited by the claim

 

 

 

 

बिहारच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी येत आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविषयी एक मोठं विधान केलं आहे.

 

 

 

जीतन राम मांझी यांनी सांगितलं की, एक कट शिजला जात असून नितीश कुमार यांच्या जेवणात त्यांना विषारी पदार्थ खायला घातले जात आहेत.

 

 

 

मांझी पुढे म्हणाले की, त्यामुळेच ते महावीर चौधरींऐवजी अशोक चौधरींवर फुलं टाकत आहेत. नितीश कुमार ज्या पद्धतीने बोलत आहेत, त्यानुसार त्यांच्या जेवणात विषारी पदार्थ दिले जात असल्याचं वाटत आहे.

 

 

 

 

जीतन राम मांझी पुढे बोलले, कुणालातरी लवकर मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्यामुळे नितीश कुमारांवरोधत कट रचला जात आहे. त्यांच्या जेवणात विषारी पदार्थ मिसळले जात आहेत.

 

 

 

 

दरम्यान, गुरुवारी बिहारच्या सभागृहात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या भाषणात जीतन राम मांझी यांच्यावर आक्रमक पद्धतीने टीका केली. ते म्हणाले होते की, माझ्या मुर्खपणामुळे जीतन राम मांझी बिहारचे मुख्यमंत्री बनले. त्यांना राज्यपाल बनायचं आहे.

 

 

 

नितीश कुमारांच्या या विधानामुळे जीतन राम मांझी यांनी पत्रकार परिषद घेऊन नितीश कुमारांवर हल्ला चढवला. त्यांनी कुमारांना दलितविरोधी असल्याचं म्हटलं आहे. तर नितीश कुमारांच्या जवळच्या लोकांवर विरोधी पक्षाचे नेते विजय सिन्हा यांनी मोठे आरोप केले आहे.

 

 

 

विजय सिन्हा म्हणाले की, जीतन राम मांझी ज्या विषारी पदार्थाचा उल्लेख करत आहेत, त्याची चौकशी झाली पाहिजे. जे लोक त्यांच्या जवळ आहेत त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *