बिहारमध्ये सत्ता जाताच लालूंना दणका

As soon as he came to power in Bihar, Lalu got a shock ​

 

 

 

 

बिहारमध्ये सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमारांनी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना पहिला मोठा धक्का दिला आहे.

 

 

आरजेडी आणि नितीशकुमारांच्या जेडीयूची सत्ता असताना विधानसभा अध्यक्षपदाचा मान आरजेडीला मिळाला होता. पण सत्ताबदल होताच नितीशकुमारांनी अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणत त्यांना हटवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

 

 

आरजेडीचे नेते अवध बिहारी चौधरी हे सध्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याची नोटीस विधिमंडळ सचिवांना देण्यात आली आहे.

 

 

भाजपचे नेते नंदकिशोर यादव आणि माजी उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद तसेच हमचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी, जेडीयूचे विनय कुमार चौधरी, रत्नेश साडा आणि एनडीएतील इतर आमदारांनी ही नोटीस दिली आहे.

 

 

 

मागील काही दिवसांपासून नितीशकुमार भाजपसोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. त्यानुसार त्यांनी रविवारी पदाचा राजीनामा देत एनडीएसोबत सरकार स्थापन केले.

 

 

त्यांनी नवव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नितीशकुमार यांनी भाजपशी युती तोडताना ते पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केली होती. तसेच पुन्हा भाजसोबत जाणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञाही केली होती.

 

 

बिहारमधील सत्तानाट्याचा थेट परिणाम आता इंडिया आघाडीवर होणार आहे. आघाडीतील दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आधीच विरोधाचा सूर आळवला आहे.

 

 

 

बंगालसह पंजाबमध्ये काँग्रेसशी आघाडी न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यात आता बिहारमध्येही आघाडीला धक्का बसला आहे.

 

 

 

बिहारमध्ये एनडीएचे संख्याबळ आता 128 वर पोहचले आहे. एकूण 243 आमदारांच्या विधानसभेत 122 हा जादूई आकडा आहे.

 

 

 

आरजेडी व काँग्रेससह आघाडीचे संख्याबळ 114 आहे. विशेष म्हणजे राज्यात 79 आमदारांसह आरजेडी सर्वात मोठा पक्ष आहे. तर भाजपकडे 78, जेडीयूकडे 45 आणि काँग्रेसचे 19 आमदार आहेत.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *