देशातील टॉप 10 लढतीमध्ये बारामती लोकसभा ;काय आहे कारण?
Baramati Lok Sabha among the top 10 contests in the country; what is the reason?

आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये नणंद भावजय यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे.
राज्यातील भाजपच्या बड्या नेत्यानं बारामती मतदारसंघ महायुतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जाणार असल्याचं सांगितलेय.
त्यामुळे आता पवार विरुद्ध पवार असाच सामना रंगण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळे या विद्यमान खासदार आहेत, तर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार मागील काही दिवसांपासून लोकसभेची तयारी करत आहेत.
अजित पवार यांनीही सुनेत्रा पवार लोकसभेसाठी रिंगणात उतरणार असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्यापुढे सुनेत्रा पवार यांचं तगडं आव्हान असेल.
महायुतीत बारामतीची जागा राष्ट्रवादीला सोडण्यास भाजप तयार आहे, असा दावा राज्यातील भाजपच्या एका मोठ्या नेत्यानं केला आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद भावजय आमने सामने येणार
हे आता जवळपास निश्चित झालेय. बारामती मतदारसंघात दोन्ही उमेदवार पवार घराण्यातलीच असतील, असा दावाही महाराष्ट्रातील एका बड्या नेत्यानं केलाय.
सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील ही लढत देशातील टॉप टेन लढतीपैकी एक लढत असेल. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे
यांच्या विरोधात भावजय सुनेत्रा पवारच निवडणुकीच्या रिंगणात, हे जवळपास निश्चित झालेय. महाविकास आघाडी विरोधात महायुती अशी लढत पाहायला मिळणार हे येणारा काळात समजेल.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात गाठीभेठी घेण्यास सुरुवात केली आहे.
दुसरीकडे विद्यमान खासदार सुप्रिया सुळेही पायाला भिंगरी बांधल्यासारखं मतदारसंघ पिंजून काढत आहेत. त्यामुळे बारामतीमध्ये नणंद भावजय असा मुकाबला होणार हे जवळपास निश्चित झालेय.
सुळे यांच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचे अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोण असणार याची चर्चा सुरू आहे.
सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार लढणार असल्याचे चर्चा जोर धरत असतानाच रोहित पवारांनी देखील अजित पवारांच्या कुटुंबातीलच उमेदवार असू शकतो अशी शक्यता वर्तवली होती.
त्यामुळे बारमातीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना रंगेल, अशीच शक्यता वर्तवण्यात येतेय. गेल्या काही दिवसापासून सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघात फिरत आहेत.
गुरुवारी दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांच्या निवासस्थानी भेट दिली. तसेच हळदी कुंकूच्या माध्यमातून महिलांना भेटत आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवार उमेदवार असतील अशी चर्चा जोर धरते आहे.