पोलीस निरीक्षकाची थेट पोलीस ठाण्यातच स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या
A police inspector committed suicide by shooting himself in the police station itself

नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात एका पोलीस अधिकाऱ्याने स्वतःवरच झाडली गोळी झाडल्याची घटना घडली आहे.या घटनेत पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केली आहे. अशोक नजन, असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे.
अशोक नजन हे अंबड पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते होते. पोलीस उपनिरीक्षक अशोक नजन यांनी पोलीस ठाण्यातच आत्महत्या केली
अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी स्वतःवर गोळी झाडल्यानंतर ते जागीच गतप्राण झाले. या घटनेमुळे नाशिकच्या पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या वर्षभरापासून अंबड पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक म्हणून अशोक नजन काम करत होते. अतिशय शांत व सोज्वळ स्वभावाचे असलेले नजन यांनी आपल्या कामातून वचक निर्माण केला होता.
आज सकाळी दहा वाजेच्या दरम्यान ते त्यांच्या कॅबिनमध्ये बसलेले होते. तेव्हा त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली. याच त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेने अंबड पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मृत्यूचं कारण मात्र अद्यापपर्यंत समजलेलं नाही. त्यांना जिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिकेद्वारे नेण्यात आलं आहे.
पोलीस निरीक्षक अशोक नजन यांनी पोलीस ठाण्यात स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधूनच गोळी झाडून घेतली. त्यांनी आत्महत्या का केली, याचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही.
सकाळी नेहमीप्रमाणे ते ड्युटीवर हजर झाले होते. आपल्या सहकाऱ्यांशी बोलून ते त्यांच्या केबिनमध्ये गेले. त्यानंतर त्यांच्या केबिनमध्ये हजेरी बुक घेऊन गेलेला एका कर्मचाऱ्याला ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यानंतर ही घटना समोर आली.
त्यानंतर लागलीच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अशोक नजन यांनी आत्महत्या का केली, हे समजू शकलेलं नाही. याशिवाय त्यांच्याकडे कोणतीही सुसाईट नोटही मिळालेली नाही, अशी महिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.