माजी राज्यपालाच्या घरावर CBIची धाड

CBI raids former governor's house

 

 

 

 

 

जम्मू आणि काश्मीरचे माजी नायब राज्यपाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टीकाकार सत्यपाल मलिक यांच्या दिल्लीतील घरी सीबीआयने छापेमारी केली आहे.

 

 

 

 

ही कारवाई किरू हायड्रोपॉवर प्रकल्पातील भ्रष्टाचाराशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. किरू हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रकल्पाशी निगडित कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याबाबत मागच्या महिन्यात सीबीआयकडून जम्मू

 

 

 

आणि काश्मीरमधील आठ ठिकाणांवर शोधमोहिम राबविण्यात आली होती. २०२२ साली जम्मू आणि काश्मीर सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती सीबीआयकडे केली होती.

 

 

 

सत्यपाल मलिक यांनी काही दिवसांपूर्वीच या प्रकल्पाशी संबंधित कंत्राट देण्यासाठी त्यांना ३०० कोटी लाच देण्याचे आमिष दाखविले असल्याचे म्हटले होते.

 

 

 

सत्यपाल मलिक हे २३ ऑगस्ट २०१८ ते ३० ऑक्टोबर २०१९ या काळात जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल होते. या काळात दोन फाईल पास करण्यासाठी त्यांना ३०० कोटींची लाच देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते, असा गौप्यस्फोट त्यांनीच काही दिवसांपूर्वी केला होता.

 

 

 

 

सीबीआयकडून या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर गैरव्यवहाराप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. २,२०० कोटींच्या किरू हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रकल्पाच्या कामात गैरव्यवहार झाल्याचे आढळून आले होते, अशी माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *