आता लोकसभेसाठी घरी बसून करता येणार मतदान;जाणून घ्या कशी असेल पद्धत

Now voting for Lok Sabha can be done sitting at home; know how the procedure will be ​

 

 

 

 

 

 

 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या तयारीला सध्या जोमाने सुरूवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय पक्ष मोर्चेबांधणीला लागले असून निवडणूक आयोगाकडून देखील तयारी केली जात आहे.

 

 

 

 

 

लोकसभा निवडणुकीसाठी वातावरण निर्मीती होत असतानाच एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या आगामी निवडणुकीत आता पहिल्यांदाच घरी बसून मतदान करता येणार आहे.

 

 

 

याला परवानगी देण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

 

 

 

त्यांनी सांगितलं की, लोकसभा निवडणुक लवकरच जाहीर होतील. मात्र निवडणूक पूर्वतयारी दीड दोन महिन्यांपूर्वी सुरू झाली असल्याचे श्रीकांत देशपांडे यांनी सांगितलं. निवडणूकांच्या तयारीबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की,

 

 

 

 

सध्या जिल्हयातील निवडणूक कार्यालयाना भेट देणे सुरू आहे. पुण्यात पहिली भेट आहे. यावेळी तयारी पाहणी दौरा तसेच आढाव बैठक घेतल्याचे श्रीकांत देशपांडे म्हणाले.

 

 

 

या आगामी निवडणूकीमध्येकाही धोरणात्मक बदल झाले असल्याचे देखील त्यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच घरी बसून मतदान करता येणार आहे,

 

 

त्याला परवानगी देण्यात आली आहे, ८० वर्षांपेक्षा जास्त, दिव्यांग व्यक्ती यांना आता घरी बसून मतदान करता येणार आहे असे श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.

 

 

निवडणूक जाहीर झाली की, १२ड फॉर्म या लोकांना पर्याय निवडण्यासाठी असतील, त्यांना घरपोच फॉर्म दिला जाईल. त्यांच्याकडून ऑप्शन घेऊन जिल्हाधिकारी यांना देण्यात येईल.

 

 

 

मतदान होईल त्याअगोदर त्यांचे मतदान करून घेण्यात येईल, मतदान मोठा उत्सव आहे. मतदान केंद्रावर येऊन करण्यासाठी आम्ही वृद्धाना सांगणार आहोत, त्यांच्याकडे पाहून मतदानाला लोक बाहेर पडतील असेही देशपांडे यांनी सांगितले.

 

 

 

 

तसेच यावेळी त्यांनी घर बसून मतदान करण्याचा प्रयोग कसबा पोट निवडणूकीत करण्यात आला होता, असेही यावेळी सांगितलं.

 

 

त्यामुळे घरी बसून व्हीडीओ रेकॉर्ड करून मतदान करता येणार आहे. कोणी मतदानापासून वंचित राहू नये यासाठी आमचा प्रयत्न आहे असेही ते म्हणाले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *