अपघातात आमदाराचे निधन
MLA dies in an accident

भारत राष्ट्र समितीच्या आमदार लस्या नंदिता यांचा शुक्रवारी अपघातात मृत्यू झाला. या दुर्घटनेतून त्यांची भाची सुदैवानं बचावली. अपघातापूर्वी नंदिता यांनी नकळतपणे घेतलेल्या निर्णयामुळे भाचीचा जीव वाचला. नंदिता यांनी अपघाताच्या काही मिनिटांपूर्वी भाचीला दुसऱ्या कारमध्ये बसवलं. त्यामुळे ती सुदैवानं बचावली.
अपघात होण्यापूर्वी काही मिनिटांआधी नंदिता यांनी त्यांच्या आईला कॉल केला. त्यांची आई दुसऱ्या कारमध्ये होती. कुकाटपल्लीतील वाय जंक्शनजवळ थांबा.
मला सदासिवपेट परिसरात नाश्ता आणण्यास पुढे जायचं आहे. त्यामुळे भाचीला तुमच्या कारमध्ये घ्या, असं नंदिता यांनी त्यांच्या आईला फोन करुन सांगितलं होतं, अशी माहिती संगारेड्डी पोलिसांनी दिली.
नंदिता यांची कार वाय जंक्शनला थांबली. त्यांची भाची कारमधून उतरली आणि दुसऱ्या कारमध्ये जाऊन बसली. यानंतर नंदिता यांची कार पुढे निघाली
. सुलतानपूरमध्ये त्यांची कार सुसाट वेगात लोखंडी रेलिंगला धडकली. या अपघातात नंदिता यांचा जागीच मृत्यू झाला. नंदिता यांची भाची काही वेळापूर्वी याच कारमध्ये बसली होती.
एका कारमधून नंदिताची आई आणि बहीण प्रवास करत होत्या. तर दुसऱ्या कारमधून आमदार नंदिता, त्यांच्या बहिणीची मुलगी, त्यांचा पीए आणि चालक आकाश प्रवास करत होते.
‘कुकाटपल्लीला पोहोचल्यावर नंदिता यांनी त्यांच्या आईला फोन केला. शहरात इतक्या लवकर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स सुरू होत नाहीत.
त्यामुळे मी सदासिवपेट परिसरात परत जाते आणि तिथून नाश्ता घेऊन येते, असं नंदिता यांनी त्यांच्या आईला सांगितलं होतं,’ अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
‘सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन मी थोड्याच वेळात येते. तुम्ही मला कुकाटपल्लीतील वाय जंक्शन परिसरात भेटा, असं नंदिता यांनी त्यांच्या आईला सांगितलं.
वाय जंक्शनला नंदिता यांची भाची त्यांच्या कारमधून उतरली. ती दुसऱ्या कारमध्ये जाऊन बसली. त्या कारमध्ये तिची आजी आणि आई, म्हणजेच नंदिताची आई आणि बहीण होती. भाचीनं अवघ्या काही मिनिटांपू्र्वी कार बदलल्यानं तिचा जीव वाचला’, असा घटनाक्रम पोलिसांनी सांगितला.