भाजपकडून हिंगोली लोकसभेवर दावा

Claim on Hingoli Lok Sabha from BJP ​

 

 

 

 

 

मराठवाड्यातील शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) खासदार असलेल्या हेमंत पाटील यांची यावेळेची लोकसभेची उमेदवारी धोक्यात आहे काय? असाच प्रश्न निर्माण होतोय.

 

 

 

कारण हिंगोली लोकसभेच्या जागेवर आता भाजपकडून दावा केला जातोय. हिंगोली जिल्हा भाजपकडून आज भाजप पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन हिंगोलीची जागा भाजपकडे सोडून घेण्याची मागणी केली जाणार आहे.

 

 

 

राज्याच्या सत्तासंघर्षामध्ये हिंगोलीचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देत उद्धव ठाकरे यांना धक्का दिला होता. त्यानंतर केंद्रात असलेल्या युती सरकार काळामध्ये

 

 

हेमंत पाटील यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केलं. आता लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजत आहेत, कोणत्याही दिवशी आता लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर केली जाऊ शकते.

 

 

असे परंतु आता हेमंत पाटील ज्या हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात या हिंगोली लोकसभेच्या जागेवर भाजपकडून प्रबळ दावा केला जातोय.

 

 

मागील अनेक दिवसांपासून हिंगोली लोकसभेच्या जागेवर भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी तयारी केली आहे. रामदास पाटील सुमठाणकर, माजी आमदार रामराव वडकुते, गजानन घुगे

 

 

 

यांच्यासह अनेक मतब्बार नेते हिंगोली लोकसभा लोकसभा लढवण्यास इच्छुक आहेत. अनेकांनी तशी तयारी सुद्धा सुरू केली आहे.

 

 

 

त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीमध्ये हिंगोली लोकसभेची जागा भाजपकडे सोडून घ्यावी, अशी विनंती पक्षश्रेष्ठीकडे केली जाणार आहे.

 

 

 

हिंगोली जिल्हा भाजपचे पदाधिकारी आणि नेतेमंडळी आज भाजपच्या पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासह

 

 

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन हिंगोलीची जागा भाजपला सोडावी, अशी विनंती हे भाजपचे पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार सुद्धा करणार आहेत.

 

 

 

राजाच्या सत्ता संघर्षामध्ये अनेक आमदार आणि खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा पसंत केलं. त्यापैकी एक म्हणजे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील.

 

 

 

 

एकनाथ शिंदे यांचा हात धरून केंद्रामध्ये सत्तेत राहण्याचा निर्णय हेमंत पाटील यांनी तेव्हा घेतला होता. याच काळामध्ये हेमंत पाटील यांचं मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा सुद्धा जोरदार स्वरूपाची सुरू आहे.

 

 

 

खासदार भेटत नसल्याची सुद्धा अनेक मतदारांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे मराठवाड्यात एकमेव खासदार असलेले हेमंत पाटील यांच्यामध्ये

 

 

 

काही प्रमाणात मतदारसंघात नाराजीचा सूर सुद्धा पाहायला मिळतोय आणि याच कारणामुळे हिंगोलीच्या जागेवर भाजप दावा ठोकताना पाहायला मिळते.

 

 

हिंगोली लोकसभेच्या जागेवरून महायुतीत चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळतेय. हिंगोली लोकसभेसाठी महायुतीतील शिवसेनेकडून

 

 

 

सध्याचे विद्यमान खासदार हेमंत पाटील हे इच्छुक असून भाजपकडून रामदास पाटील सुमठाणकर, रामराव वडकुते, गजानन घुगे यांच्यासह अनेक नेतेमंडळी इच्छुक आहेत.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *