क्रिसेंट इंटरनॅशनल शाळेमध्ये “मराठी भाषा गौरव दिवस” उत्साहात साजरा
“Marathi Language Pride Day” was celebrated with great enthusiasm at Crescent International School
दिनांक 27 फेब्रुवारी हा दिवस “मराठी राजभाषा गौरव दिन” म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वेळी मराठीचे प्रसिद्ध कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज ) यांचा जन्मदिवस साजरा केला यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर महेश रामचंद्र सरोदे
वरिष्ठ वार्ताहर उपस्थित होते पाहुण्यांचे स्वागत श्री इरफान सौदागर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले करण्यात आले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जहरा कुलसू व अलिना शेख यांनी उत्कृष्ट पद्धतीने केले
इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी भाषणे, गीत, कविता, वाक्यप्रचार,साहित्याचे प्रकार मराठी भाषा पर कविता प्रस्तुत करण्यात आले.
या कार्यक्रमातील विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले मराठी भाषेचा विकास
आणि प्रसाराला चालना मिळावी या दृष्टिकोनातून
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शेख पाकीजा व श्री इरफान सौदागर सर यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी शिक्षिका शेख मसर्रत व शेख कौसर यांच्या अथक प्रयासाने
हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांची खूप प्रशंसा केली . या कार्यक्रमाच्या वेळी शाळेचे सदस्य शेख आदिल सुद्धा उपस्थित होते
आणि कार्यक्रमाच्या शेवटी इयत्ता सहावीचा विद्यार्थी मुशफिक यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले. व सगळ्यांना मराठी दिवसाच्या शुभेच्छा देण्यात आले.