भाजपकडून लोकसभा निवडणूक २०२४साठी १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
BJP announced first list of 195 candidates for Lok Sabha Election 2024
लोकसभा निवडणूक २०२४साठी भाजपची पहिली यादी आज शनिवारी २ मार्च रोजी जाहीर झाली. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी राजधानी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही यादी जाहीर केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा वारणसीतून निवडणूल लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपने पहिल्या यादीत १९५ उमेदवारांची घोषणा केली आहे.
यात ३४ केंद्रीय मंत्री आणि राज्य मंत्र्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. ज्यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यात एक लोकसभेचे अध्यक्ष आणि दोन राज्यांचे मुख्यमंत्र्यांना संधी दिल्याचे तावडे यांनी सांगितले.
भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नाही. पहिल्या यादीत ज्या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे त्यात वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी,गांधीनगरमधून अमित शहा,
उत्तर गोव्यातून श्रीपाद नाईक यांचा समावेश आहे. पहिल्या यादीत २८ महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. पहिल्या यादीत ४७ असे उमेदवार आहेत
ज्यांचे वय ५० पेक्षा कमी आहे. यादीत २७ उमेदवार SC तर १८ उमेदवार ST आहेत. तर ५७ उमेदवार हे ओबीसी असल्याचे तावडे यांनी सांगितले.
केरळमधून माजी संरक्षण मंत्री एके अँटनी यांच्या मुलाला उमेदवारी देण्यात आली आहे. तर माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांची मुलगी बासुरी स्वराज यांना उमेदवार दिली आहे.
प्रमुख उमेदवार-
वाराणसी- नरेंद्र मोदी (पंतप्रधान)
गांधीनगर- अमित शहा (केंद्रीय गृहमंत्री)
अरुणाचल वेस्ट- किरण रिजिजू
गुना-ज्योतिरादित्य शिंदे
विदिशा- शिवराज सिंह चौहान (माजी मुख्यमंत्री, मध्य प्रदेश)
कोटा- ओम बिर्ला (लोकसभा अध्यक्ष)
अमेठी- स्मृती इराणी
लखनऊ- राजनाथ सिंह
मथुरा- हेमा मालिनी
राज्यानुसार उमेदवारी
उत्तर प्रदेश- ५१
पश्चिम बंगाल- २०
मध्य प्रदेश- २४
गुजरात- १५
राजस्थान- १५
केरळ- १२
तेलंगणा- ०९
आसाम- १२
झारखंड- ११
छत्तीसगड- ११
दिल्ली- ०५
जम्मू काश्मीर- ०२
उत्तराखंड- ०३
अरुणाचल प्रदेश- ०२
गोवा- ०१
त्रिपूरा-०१
अंदमान निकोबार- ०१
दीव दमण- ०१