चक्क RTOऑफिसमध्ये फिरू लागला भामटा RTO अधिकारी म्हणून;मराठवाड्यातील घटना

Bhamta started roaming in RTO office as RTO officer; incident in Marathwada

 

 

 

 

बीडमध्ये काल आरटीओ ऑफिसच्या परिसरात एक आरटीओ ऑफिसर फिरताना पाहायला मिळाला. बराच वेळ हा अधिकारी काहीतरी काम करीत होता.

 

 

 

यामुळे दुर्लक्ष करण्यात आलं. मात्र, बीडच्या काही अधिकाऱ्यांना त्याच्यावर संशय आल्याने त्याच्याकडे विचारपूस केली असता

 

 

तो चक्क तोतया अधिकारी असल्याचं उघड झालं आहे. त्यानंतर त्याला ताब्यात घेत बीड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात आरटीओच्या अधिकाऱ्यांनी दिलं आहे.

 

गेल्या काही महिन्यांपासून अंबाजोगाई शहरात ”मी आरटीओ अधिकारी इन्स्पेक्टर” असल्याचं सांगत राहुल नाईकवाडे नामक व्यक्ती सर्रास लोकांची फसवणूक करत होता.

 

 

 

यात ”तुमचे काम करून देतो” असेही म्हणत तो नेहमीच बीडवारी करत होता. मात्र, यावेळेस तो चक्क वर्दीवरच बीडच्या आरटीओ ऑफिसमध्ये आला.

 

 

 

सुरुवातीला अंबाजोगाई येथील काही लोकांची कामे घेऊन तो आरटीओमध्ये ऑफिसमध्ये आला. अनेकांना या परिसरात अधिकाऱ्यांसह भेटला. हे काम करण्याचं त्यांनी सांगितलं.

 

 

 

मात्र, यातील काही बड्या अधिकाऱ्यांना त्याच्यावर संशय आला. कारण अंगावर घातलेली वर्दी आणि त्यावरील काही खानाखुणा या लक्षात आल्याने अधिकाऱ्यांनी त्याची विचारपूस केली.

 

 

या विचारपूसमध्ये तो अधिकारी तोतया असल्याचं उघड झालं. तात्काळ त्याला अधिकाऱ्यांनी तिथेच पकडून धरत बीड ग्रामीण पोलीस यांना फोन करत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

 

 

 

 

त्याच्यावर ४२० अंतर्गत त्यावर गुन्हा दाखल देखील करण्यात आला आहे. अशा प्रकारे भोंदूगिरी करत लोकांना फसवणारी टोळी सध्या सक्रिय आहे का?असाच प्रश्न समोर येत आहे.

 

 

 

 

बारावीच्या परीक्षेत चक्क एका भावाने पोलीस वर्दी घालत कॉप्या पुरवण्याचा प्रकार झाला होता. तो देखील लवकर उघड आला

 

 

 

आणि त्यानंतर आता हा आरटीओ इन्स्पेक्टर म्हणून गेला कित्येक महिन्यांपासून हिंडतोय हे देखील आता उघड झालं आहे. यासाठी आपल्यासमोर असलेला अधिकारी हा खराच शासकीय अधिकारी आहे का?

 

 

 

हे ओळखणे आता जिगरीचं झालं आहे. अशा लोकांपासून सावध राहण्याचं आरटीओ कार्यालयासह पोलीस प्रशासनाने जनतेला आवाहन केलं आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *