बिहारमध्ये पुन्हा राजकीय भूकंप होणार

There will be another political earthquake in Bihar

 

 

 

 

बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार ‘एनडीए’मध्ये दाखल झाले असले तरी भाजपची डोकेदुखी कमी झालेली नाही. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर

 

 

मित्रपक्ष असलेल्या लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास पासवान) प्रमुख चिराग पासवान यांची नाराजी दूर करता आलेली नाही. भाजपकडून संयुक्त जनता दलाला झुकते माप दिले जात असल्याने पासवान यानी

 

 

एनडीएच्या उमेदवारांविरोधात उमेदवार देण्याची तयारी सुरू केल्याचे समजते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

चिराग पासवान यांची नाराजी लक्षात घेऊन इंडिया आघाडीने त्यांना आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. आघाडीतून पासवान यांना बिहारमध्ये लोकसभेच्या आठ

 

 

 

आणि उत्तर प्रदेशात दोन जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. पासवान यांनी ही ऑफर स्वीकारल्यास बिहारमध्ये एनडीएला फटका बसू शकतो.

 

 

 

पासवान यांच्याकडून बारा जागांची मागणी भाजपकडे केली जात आहे. पण एनडीएमध्ये निम्म्याच जागा त्यांच्या वाट्याला येऊ शकतात. त्यातही एकदी जागा कमी होण्याची शक्यता आहे.

 

 

 

पासवान यांचे चुलते आणि राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख पशुपती पारस यांच्यासाठी भाजपकडून उरलेल्या जागा सोडल्या जाणार आहेत.

 

 

 

रामविलास पासवान यांच्या निधनानंतर लोक जनशक्ती पक्षामध्ये 2021 मध्ये फुट पडली. त्याआधी 2020 मध्ये चिराग पासवान एनडीएमधून बाहेर पडले होते.

 

 

 

पारस यांना केंद्रात मंत्रिपद दिल्याने ते नाराज होते. नितीश कुमार एनडीएतून बाहेर पडल्यानंतर पासवान पुन्हा एनडीएसोबत आले. आता काही दिवसांपूर्वीच नितीश कुमारांनी पुन्हा भाजपचा हात धरल्याने पासवान नाराज झाले आहेत.

 

 

 

 

काँग्रेसने ही संधी साधत पासवान यांना 2019 मध्ये त्यांनी लढलेल्या सर्व सहा जागांसह आणखी दोन जागांची ऑफर दिली आहे. उत्तर प्रदेशातही दोन जागा देण्याची तयारी आघाडीने केल्याचे समजते.

 

 

 

आता पासवान यावर काय निर्णय घेणार, त्यानुसार बिहारमधील लोकसभेची राजकीय गणितं अवलंबून असणार आहेत. पासवान आघाडीमध्ये दाखल झाल्यास भाजप आणि जेडीयूलाही निवडणुकीत दणका बसू शकतो.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *