ममता बॅनर्जी इंडिया आघाडीतून बाहेर

Mamata Banerjee out of India Alliance

 

 

 

 

 

ममता बॅनर्जी यांच्या एका खेळीने राजकीय सारापाटावरील गणितं विस्कटली. इंडिया आघाडीच्या मंचावर काँग्रेस दुय्यम वागणूक देत असल्याचा राग त्यांनी यापूर्वी पण आलापला होता.

 

 

 

राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेवर पण त्यांनी दण आपट केली होती. त्याचवेळी नितीशबाबू यांच्यापूर्वीच ममता आघाडीत बाहेर पडतात की काय असे वाटत होते.

 

 

 

सुरुवातीला ट्रेलर दाखविल्यानंतर आता दीदींनी चित्रपट दाखवला. पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकीतील सर्वच जागांवरील

 

 

तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांची यादी त्यांनी जाहीर केली. त्यामुळे त्यांनी आता भाजपसह इंडिया आघाडीला पण थेट इशारा दिला आहे.

 

 

 

इंडिया आघाडीचे पश्चिम बंगालमधील काय होणार, हे सांगायला राजकीय ज्योतिषाची गरज नव्हती. काँग्रेससोबत तृणमूलचा ताळमेळ किती बसेल याविषयी मोठी साशंकता होती.

 

 

 

 

ती अखेर खरी ठरली. बैठका सुरु असताना पण टीएमसीचे अनेक नेते काँग्रेसला थेट विरोध करत होते. दोन्ही पक्षात सामंज्यस नव्हते.

 

 

 

त्यामुळे शेवटी ममता बॅनर्जी यांनी एकला चलो रेचा नारा दिला. तसेच संदेशखालीप्रकरणात भाजपने जी रणनीती आखली त्यात दीदी एकट्या पडल्याचे चित्र समोर आले. त्यातूनच आघाडीतील ऐक्याबाबत शंका उठली होती.

 

 

 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रदेशातील सर्वच्या सर्व 42 मतदार संघात उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये क्रिकेटर युसूफ पठाण याला बहरामपूर लोकसभा मतदार संघातून तिकीट देण्यात आले आहे.

 

 

 

काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्याशी त्याचा थेट मुकाबला होईल. तर महुआ मोईत्रा कृष्णानगरमधून निवडणूक लढवतील. सध्याचे खासदार बॉलिवूड अभिनेता शत्रुघ्न सिन्हा हे आसनमोलमधून लढतील.

 

 

माजी क्रिकेटर किर्ती आझाद बर्दमान-दुर्गापूर मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. गेल्यावर्षी ही जागा भाजपने जिंकली होती.

 

 

 

तर बशीरहाट जागेवरुन हाजी नुरुल इस्लाम निवडणूक लढवतील. सध्याच्या खासदार नुसरत जहां यांचे तिकीट कापण्यात आले आहे.

 

 

 

आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये टीएमसीने एकला चलो रेचा नारा दिल्याने इंडिया आघाडीला झटका बसला आहे. आता काँग्रेससह मित्रपक्षांना पुन्हा रणनीती आखावी लागणार आहे.

 

 

 

 

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षासोबत तृणमूलची चर्चा सुरु आहे. या जागांची घोषणा करताना बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *