खडसेंच्या मतदारसंघामध्ये भाजपसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा डमी उमेदवार

Dummy candidate of Sharad Pawar's NCP for BJP in Khadse's constituency

 

 

 

 

 

एकनाथ खडसे यांनी रावेर मतदारसंघात भाजपला बाय दिला आहे. रक्षा खडसे यांच्या विरोधात खडसेंनी डमी उमेदवार दिला.

 

 

त्यांनी कौटुंबिक स्वार्थासाठी राष्ट्रवादीचा बळी घेतला, असा घणाघाती आरोप शिंदे गटाला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

 

 

 

 

रावेर मतदार संघातील महायुतीला पाठिंबा दिलेले आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांची चांगलीच झाडाझडती घेतली आहे.

 

 

 

लोकसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघात स्वार्थासाठी पक्षाचा बळी देऊन खडसे यांनी तडजोड केली, असा अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली.

 

 

 

“खडसे यांनी अतिशय नियोजन पूर्वक आपल्या कौटुंबिक स्वार्थासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा बळी दिला आहे. सध्याचे राजकारण प्रामाणिकपणे काम करणारे

 

 

 

 

आणि विचारांवर निष्ठा ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांचे राहिले नाही. दोन-तीन पक्षांवर निष्ठा ठेवून कुटुंब एकच आणि पक्ष अनेक, अशी स्थिती असलेल्या नेत्यांचे झाले आहे.

 

 

 

 

त्यातून सामान्यांचा राजकारणावरील विश्वास उडेल, अशी स्थिती आहे. त्यामुळे मी महायुतीचा घटक असलो तरीही खडसे यांचा प्रचार करायचा की नाही हे वेळ आल्यावर ठरवेल.

 

 

 

एकनाथ खडसे जेवढा राष्ट्रवादीचा प्रचार करतील, तेवढाच प्रचार मी महायुतीचा करेल,” असा चिमटा ही पाटलांनी खडसेंना काढला आहे.

 

 

 

 

“ज्या पद्धतीने जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपने उमेदवार जाहीर केले. त्यानंतर खडसे यांनी रावेर मतदार संघ राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासाठी मागून घेतला.

 

 

 

पण, त्याच पद्धतीनं स्वतः निवडणुकीतून माघार घेतली. हे अतिशय बोलके आहे. शरद पवार यांना हे मान्य आहे का? एकनाथ खडसे यांचे हे राजकीय कौशल्य म्हणायचे का?

 

 

 

 

त्यामुळे सध्याची निवडणूक ही राष्ट्रवादीने भाजपला बाय दिल्यासारखे आहे, अशी ग्रामीण भागातील मतदारांची भावना झाली आहे,” असं आमदार पाटलांनी सांगितलं.

 

 

 

 

“एकनाथ खडसे यांनी रावेर लोकसभा मतदारसंघात आधी उमेदवारी मागून घेतली. त्यानंतर माघार घेतली. आता ते डमी उमेदवार देत आहेत.

 

 

 

यावरून त्यांचे राजकारण सर्वकाही कुटुंबासाठी असे आहे. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. महायुतीचा अर्थात भाजपचा उमेदवार विजयी करण्यासाठी घेतलेला हा उघड उघड निर्णय आहे,” असा आरोप देखील आमदार पाटील यांनी केला.

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *