शिंदेंचे दोन खासदार कमळावर ?

Shinde's two MPs on the lotus?

 

 

 

 

 

भाजपकडून काही जागांवर हक्क सांगत तर काही मतदारसंघात विद्यमान खासदारांच्या विरोधात जनमत असल्याचे कारण पुढे करत शिंदे गटाच्या काही खासदारांचे तिकीट कापण्याचा प्रयत्न सुरू होता;

 

 

 

मात्र, असे केल्यास आमदारांमध्ये अविश्वासाची भावना निर्माण होऊन ते वेगळी वाट धरतील या भीतीने शिवसेना मुख्यमंत्री शिंदे गटाच्या सर्व खासदारांना

 

 

 

उमेदवारी मिळण्याची चिन्हे आहेत. यामुळे १३ पैकी किमान १२ खासदारांना धनुष्यबाण तर एक- दोन जागावर कमळ चिन्ह मिळण्याची शक्यता दिसत आहे.

 

 

राज्यात शिवसेना शिंदे गटाचे १३ खासदार आहेत. यातील सर्वांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देण्याचा शब्द शिवसेना सोडताना देण्यात आला होता.

 

 

 

 

हा शब्द खुद्द गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. यामुळे तेरा खासदार आघाडीत सहभागी झाले. पण गेल्या दोन-तीन महिन्यात यातील काही खासदारांच्या उमेदवारीवर टांगती तलवार असल्याचे दिसत आहे.

 

 

 

काही ठिकाणी भाजपने हक्क सांगितला आहे, तर काही ठिकाणी विद्यमान खासदारांचा परफॉर्मन्स चांगला नसल्याचे कारण पुढे केले जात आहे.

 

 

 

 

येथे भाजपचा उमेदवार घ्या आणि धनुष्यबाण चिन्हावर लढा असा प्रस्ताव पुढे केला जात आहे. यातूनच शिंदे गटाकडून चार ते पाच जागा

 

 

 

 

काढून घेण्याबाबत हालचाली झाल्या होत्या. काही जागांवर तर भाजपचा उमेदवार आणि चिन्ह शिंदे गटाचे असाही प्रस्ताव देण्यात आला.

 

 

 

 

या पार्श्वभूमीवर तिकीट कापले जाणार अशी शक्यता भीती निर्माण झाल्यानंतर तेराही खासदार आक्रमक झाले. त्यांनी दबाव गट निर्माण करत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

 

 

 

 

आम्हाला सर्वांना उमेदवारी मिळालीच पाहिजे असा आग्रह धरला आहेत. तसे न झाल्यास कोल्हापूरचे संजय मंडलिक यांच्यासह अनेकांनी बंडखोरी करण्याचा इशारा दिला.

 

 

 

 

 

खासदारांना तिकीट न दिल्यास शिंदे गटाविषयी शब्द न पाळल्याबद्दल खासदार आणि आमदारांच्या मनात वेगळी भूमिका निर्माण होईल.

 

 

 

 

यामुळे सोबत आलेले अनेक आमदारही परतीचा रस्ता धरतील, अशी भीती शिंदे गटाच्या नेत्यांना वाटू लागली आहे. यामुळे आत्तापर्यंत शांत असलेल्या मुख्यमंत्र्यांनी अचानक आक्रमक पवित्रा घेत सर्व तेरा खासदारांना तिकीट दिलेच पाहिजे

 

 

 

 

असा आग्रह धरला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या किमान १२ खासदारांना तरी पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता वाढली आहे. यातील एक-दोघांना कमळ चिन्हावर संधी मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *