ठाकरेंच्या शिवसेनेचे २० उमेदवार फायनल;फक्त जाहीर होणे बाकी ;पाहा मतदारसंघनिहाय यादी
Thackeray's Shiv Sena's 20 candidates final; yet to be announced; see constituency-wise list
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी २० उमेदवार जवळपास निश्चित केले आहेत. पक्षफुटीनंतर ठाकरेंसोबत राहिलेल्या पाच खासदारांना पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे.
दीड महिन्यांपूर्वी हत्या झालेल्या अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना उत्तर मुंबईतून उमेदवारी देण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. तेजस्वी घोसाळकर माजी नगरसेविका आहेत.
ठाण्यात शिवसेना रुजवणाऱ्या, वाढवणाऱ्या आनंद दिघेंचे सख्खे पुतणे केदार दिघे यांना कल्याणमधून तिकीट दिलं जाणार आहे.
दिघेंचा सामना विद्यमान खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्याशी होईल. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची यादी
अधिकृतरित्या जाहीर झालेली नाही. काही उमेदवारांची नावं ठाकरेंकडून त्या-त्या जिल्ह्यांमध्ये संवाद मेळाव्यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली.
सांगलीतून ठाकरेंनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. यावरुन काँग्रेसनं आक्षेप घेतला. इथून काँग्रेसकडून विशाल पाटील इच्छुक आहेत.
सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसच लढवेल, अशी स्थानिक नेत्यांची भूमिका आहे. तर कोल्हापुरात
शिवसेनेचा खासदार असूनही आम्ही ती जागा काँग्रेसला सोडली आहे. त्यामुळे सांगलीची जागा आम्हीच लढवणार, अशी शिवसेनेची भूमिका आहे.
मुंबईत लोकसभेच्या एकूण सहा जागा आहेत. गेल्या निवडणुकीत सेनेचे ३ उमेदवार निवडून आले. त्यातील २ खासदार शिंदेंकडे गेले. मुंबईत कमबॅक करण्यासाठी ठाकरेंनी सर्व ताकद पणाला लावली आहे.
सहापैकी पाच जागा ठाकरेंची सेना लढवणार आहे. वायव्य मुंबईचे सेना खासदार गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांना
तिकीट जाहीर झालं आहे. गजानन कीर्तीकर सध्या शिंदे गटात आहेत. तर ठाण्यातील तीनपैकी दोन जागांवर सेनेचे उमेदवार निश्चित झाले आहेत.
कोणत्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी? पाहा संभाव्य यादी
बुलढाणा- नरेंद्र खेडेकर
यवतमाळ-वाशिम- संजय देशमुख
हिंगोली- नागेश अष्टीकर
परभणी- संजय जाधव
रायगड- अनंत गीते
धाराशिव- ओमराजे निंबाळकर
सांगली- चंद्रहार पाटील
रत्नागिरी-सिंधुदुर्ग- विनायक राऊत
छ. संभाजीनगर- अंबादास दानवे
मावळ- संजोग वाघेरे
शिर्डी- भाऊसाहेब वाकचौरे
नाशिक- विजय करंजकर
पालघर- भारती कामडी
कल्याण- केदार दिघे
ठाणे- राजन विचारे
मुंबई उत्तर- तेजस्वी घोसाळकर
मुंबई उत्तर पश्चिम- अमोल कीर्तीकर
मुंबई उत्तर पूर्व- संजय दीना पाटील
मुंबई दक्षिण मध्य- अनिल देसाई
मुंबई दक्षिण- अरविंद सावंत