मराठवाड्यात शिंदेगटाला फक्त एकच जागा ?
Only one seat for Shinde in Marathwada?
महाविकास आघाडीप्रमाणेच महायुतीमध्येही जागावाटपाचे गुऱ्हाळ चालूच आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांत अनेक जागांवरून वाद सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरही अद्याप ठोस तोडगा निघू शकलेला नाही. दरम्यान, मराठवाड्यात मोठी ताकद असूनही एकनाथ शिंदेयांच्या शिवसेनेला येथे फारशा जागा मिळण्याची शक्यता नाही.
मिळालेल्या माहितीनुसार गेल्या अनेक दशकांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या संभाजीनगरची जागादेखील भाजपकडेच राहण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात लोकसभेच्या एकूण आठ जागा आहेत. मात्र या आठपैकी साधारण सहा जागांवर भाजपाचे उमेवार असतील. म्हणजेच ताकद असूनही शिंदे यांच्या शिवसेनेला येथे कमी जागा मिळणार आहेत.
लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी भाजपचे केंद्रीय नेते अमित शाह यांनी संभाजीनरात येऊन मोठी सभा घेतली होती. म्हणजेच अमित शाहांच्या सभेच्या रुपात भाजपने येथे चांगले शक्तीप्रदर्शन करत
या जागेवर दावा सांगायला चालू केले होते. आता या जागेसाठी भाजपकडून शिंदे यांच्या शिवसेनेवर दबाव टाकला जात आहे. आम्ही केलेल्या सर्वेक्षणात ही जागा आमच्यासाठी अनुकूल आहे, असे भाजपकडून सांगितले जातेय.
भाजपने याआधीच बीड, जालना, नांदेड, लातूर या जागांसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केलेली आहे. म्हणजेच मराठवाड्यातील आठ पैकी चार जागांवर तर भाजपचे उमेदवार असणार हे स्पष्ट झालेले आहे.
उर्वरित हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या जागांसाठीही भाजपकडून जोर लावला जातोय. हिंगोली जिल्ह्यात सध्या शिवसेनेचा खासदार आहे. त्यामुळे शिवसेना ही जागा सोडायला तयार नाही.
धाराशिव आणि परभणी या जागादेखील आम्हालाच मिळाव्यात अशी शिवसेनेची भूमिका आहे. त्यामुळे हिंगोली, धाराशीव आणि छत्रपती संभाजीनगर या जागांबाबत महायुतीत नेमका काय तोडगा निघणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, मराठवाड्यात शिंदे यांच्या शिवसेनेची मोठी ताकद आहे. येथे शिवसेनेचा एक खासदार आणि तब्बल 10 आमदार आहेत.
तरीदेखील शिवसेनेला मराठवाड्यात समाधानकारक जागा मिळण्याची चिन्हे नाहीत. छत्रपती संभाजीनगराच्या जागेवर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वांचं भाष्य केलंय.
भाजपचा उमेदवार असेल की शिवसेनेचा असा विचार करण्यापेक्षा, हा विषय प्रतिष्ठेचा विषय करण्यापेक्षा जो जिंकून येईल त्याला जागा देण्यात येणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात हाच महायुतीचा फॉर्म्यूला आहे, असं बावनकुळे म्हणालेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरही हातातून जाते की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.