भाजपचे महाराष्ट्रातील तिन उमेदवार जाहीर
Three candidates of BJP announced in Maharashtra
भाजपने महाराष्ट्रातील लोकसभेसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये राम सातपुते यांना सोलापुरातून भाजपकडून लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्याता आली आहे.
यासोबत महाराष्ट्रातील आणखी दोन उमेदवारांची नावे भाजपने जाहीर केली आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघात सुनील मेंढे यांना
लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. तसेच, गडचिरोली-चिमूर अशोक महादेवराव नेते यांना भाजपने लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे.
महाराष्ट्रातील भाजपची तिसरी यादी
सोलापूर – राम सातपुते
गडचिरोली-चिमूर – अशोक महादेवराव नेते
भंडारा-गोंदिया – सुनील बाबुराव मेंढे
भाजपकडून सोलापूर लोकसभेसाठी आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर होताच सोलापुरात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली. काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी मिळाली आहे.
भाजपकडून सर्वसामान्य तरुणाला उमेदवारी दिल्याने ही लढाई म्हणजे घराणेशाही विरोधाची लढाई असल्याचे मत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आहे.
राम सातपुते हे मतदार संघात गावोगावी फिरून नागरिकांचे प्रश्न जाणून ते सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न करत असतात. जरी ते इतर जिल्ह्यातले असले तरी मागील पाच वर्षात त्यांनी सोलापूर जिल्ह्यात आपली चांगली ओळख निर्माण केली आहे.
विशेष म्हणजे त्यांच्या नावात ‘राम’ असल्याने भाजपला हा मोठा फायदा होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. आता भाजपकडून
त्यांना उमेदवारी मिळाल्यावर निश्चितच आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार राम सातपुते यांच्यातील लढत तितक्याच ताकदीची पाहायला मिळेल.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने पाचवी यादी शनिवारी जाहीर केली. यादीत कंगना रनौत , अरुण गोविल , नविन जिंदाल, सीता सोरेन आदी चर्चेतील चेहऱ्यांना भाजपने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.
संबलपूरमधून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि ओडिशातील पुरीमधून पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांना उमेदवारी दिली आहे.
पिलिभित लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार वरुण गांधी यांचे तिकीट कापण्यात आले आहे. योगी सरकारमध्ये मंत्री जितिन प्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
पक्षाने वरुण गांधींना डच्चू दिला आहे. त्यामुळे वरुण गांधी यांचे राजकीय भवितव्य काय असेल, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.
वरुण गांधी हे समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढतील, अशी चर्चा उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात आहे. वरुण यांना उमेदवारी देण्याबाबात अखिलेश यादव सकारात्मक आहे.
मात्र, यावेळी पिलिभितची लढाई वरुण यांच्यासाठी इतकी सोपी नाही. अपक्ष उमेदवार म्हणूनही ते निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे.
दारसंघात मेनका गांधी सहा वेळा खासदार झाल्या आहेत. 2009 मध्ये त्यांनी वरुण गांधींसाठी पीलीभीतची जागा सोडली आणि सुलतानपूरमधून निवडणूक लढवली.
त्यानंतर पीलीभीतमधून निवडणूक जिंकून वरुण संसदेत पोहोचले. मात्र, 2014 मध्ये पुन्हा एकदा मेनका गांधी पीलीभीतमधून विजयी झाल्या आणि संसदेत पोहोचल्या. वरुण गांधी 2019 मध्ये पीलीभीतला परतले आणि निवडणूक जिंकले.
आता मेनका गांधींना सुलतानपुरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर अरुण गोविल यांना मेरठमधून भाजपने मैदानात उतरवलं आहे. सहारनपूरमधून राघव लखनपाल, मुरादाबादमधून सर्वेश सिंह,
गाझियाबादमधून अतुल गर्ग, अलिगढमधून सतीश गौतम, हाथरसमधून अनुप बाल्मिकी, बदायूंतून दुर्विजय सिंह शाक्य, बरेलीतून छत्रपाल सिंग गंगवार,
कानपूरमधून रमेश अवस्थी, बाराबंकी (एससी) मधून राजराणी रावत, बहराइच (एससी) अरविंद गोंड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
आंध्र प्रदेशातून भाजप सहा जागा लढवणार आहे. भाजप-टीडीपी-जेएसपी आघाडीत जागावाटपाचा हा फॉर्म्युला ठरविण्यात आला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष पुरंदेश्वरी यांना राजमुंद्री, कोथापल्ली गीता यांना अराकू, सीएम रमेश यांना अनाकापल्ले आणि आणि माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांना राजमपेट लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.