आणखीन एक महामारी कधीही धडकू शकते..शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा
Another epidemic can strike anytime..Scientist's serious warning

कोरोना महामारीला 11 मार्च 2020 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक महामारी घोषित केले होते. या घटनेला आता चार वर्ष उलटू गेली आहेत. सध्या कोरोनाचा धोका कमी झाला असला तरी, तज्ञांनी जगात दुसरी महामारी कधीही उद्भवू शकते असा इशारा दिला आहे.
स्काय न्यूजच्या अहवालानुसार, यूकेमधील संसर्गजन्य रोगांचा अभ्यास करणाऱ्या तज्ञांनी प्राण्यांपासून मानवांमध्ये विषाणूंचे संक्रमण होण्याच्या आणि दुसऱ्या साथीच्या रोगास कारणीभूत ठरण्याच्या शक्यतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
पुढील महामारी लवकरच धडकण्याची शक्यता आहे. यासाठी दोन, 20 वर्षेही किंवा त्यापेक्षा जास्त काळही लागू शकतो. परंतु आपण यासाठी सावधगिरी बाळगणे थांबवू शकत नाहीत.
आपण जागृत, तयार आणि पुन्हा त्याग करण्यास तत्पर राहण्याची गरज आहे, असे मत किंग्ज कॉलेज लंडनमधील संसर्गजन्य रोगांच्या क्लिनिकल लेक्चरर डॉ नॅथली मॅकडरमॉट यांनी व्यक्त केले आहे.
ग्लोबल वॉर्मिंग आणि जंगलतोड यामुळे विषाणू प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरण्याचा धोका वाढत असल्याचा इशाराही शास्त्रज्ञांनी दिला आहे.
ॲमेझॉन आणि आफ्रिकेच्या काही भागांमध्ये झाडे तोडल्याने प्राणी आणि कीटक मानवी वस्तीच्या जवळ जात असल्याचे डॉ. मॅकडरमॉट यांनी स्पष्ट केलं. तसंच आपण अशी परिस्थिती निर्माण करत आहोत जी महामारीच्या उद्रेकासाठी पोषक आहे असंही त्या म्हणाल्या.
यासोबतच जगभरातील वाढत्या तापमानामुळे, डेंग्यू, चिकनगुनिया आणि क्रिमियन काँगो हेमोरेजिक फिव्हर यांसारख्या डासांचा प्रादुर्भाव युरोपच्या काही भागांमध्ये पहिल्यांदाच दिसून येत आहे, असंही सांगितलं.
कोरोना माहामारीला अनेकदा आयुष्यात एकदाच घडणारी घटना म्हणून संबोधले जाते. मात्र, जगभरात अंदाजे सहा मिलीयनहून अधिक मृत्यू घेऊन आलेला साथीचा रोग चार दशकांपूर्वी उदयास आला होता.
तसंच 1981 मध्ये समोर आलेल्या HIV/AIDS मुळे जगभरात 36 मिलीयन मृत्यू झाले आहेत. त्याआधी, 1968 मध्ये हाँगकाँग फ्लू महामारीमुळे अंदाजे एक मिलीयनहून अधिक मृत्यू झाले होते आणि 1918 च्या स्पॅनिश फ्लूने 50 मिलीयन लोकांचा बळी घेतला होता.