जागावाटपाचा तिढा अजितदादांनी बोलावली आमदार-मंत्र्यांची बैठक

Ajit Dada called a meeting of MLAs and Ministers over seat allocation

 

 

 

 

 

महायुतीमधील जागावाटप आणि उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. काही मोजक्या मतदारसंघांबाबत अडवणुकीची भूमिका घेतल्याने हा तिढा आणखी चिघळला आहे.

 

 

 

 

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज (मंगळवारी) पुण्यात पक्षाची बैठक बोलावली आहे. यात पक्षाचे सर्व मंत्री, आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत.

 

 

 

 

जागावाटपाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याने या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. दुपारी बारा वाजता बोट क्लब येथे ही बैठक होईल.

 

 

 

 

या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, आमदार, खासदारांनी उपस्थित राहावे, असा आदेश पक्षातर्फे काढण्यात आल्याची चर्चा आहे.

 

 

 

दरम्यान, सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी जवळीक वाढवलेले पारनेरचे आमदार नीलेश लंके या बैठकीला उपस्थित राहणार का, याबाबत उत्सुकता आहे.

 

 

भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीच्या जागावाटपाचे सूत्र अजून अंतिम झालेले नाही. काही जागांवरून तिन्ही पक्षात वाद सुरू आहेत. काही जागांवर दोन पक्षांनी दावा केला आहे.

 

 

 

अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी सात जागांची मागणी करत असली, तरी पाच जागांसाठी पक्ष विशेष आग्रही आहे. यात साताऱ्याच्या जागेवर भारतीय जनता पक्षाकडून उदयनराजे भोसले यांना

 

 

 

 

निवडणूक लढवायची आहे. तर या जागेवर सध्या राष्ट्रवादीचे खासदार असल्याने राष्ट्रवादीने या जागेवरचा हक्क सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

 

 

 

 

याशिवाय महायुतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रीय समाज पक्ष असे नवे मित्रपक्ष येण्याची शक्यता आहे. त्यामुळे होणाऱ्या संभाव्य

 

 

राजकीय परिणामांबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. या सर्व बाबी, तसेच पक्षाची भविष्यातील रणनीती यावर या बैठकीत चर्चा होईल.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *