पवारांची दमदार इंट्री म्हणाले , वय काढू नका, तुम्ही अजून काय पाहिलं

Pawar's strong entry said, don't take age, what else have you seen

 

 

 

 

 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत विरोधकांकडून वेळोवेळी त्यांच्या वयावरून टिप्पणी केली जाते. याबाबत शरद पवार यांनी मिश्किल टिप्पणी करत विरोधकांना टोला लगावला आहे.

 

 

 

 

 

 

शरद पवार म्हणाले की, अनेकजण ८४, ८५ वय झाले असं म्हणतात. तुम्ही वय काढू नका, तुम्ही अजून काय पाहिलं आहे, हा गडी थांबणारा नाही,

 

 

 

 

ज्या लोकांनी साथ दिली, त्या लोकांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत जनहिताची कामं करत राहील, अशी ग्वाही पवार यांनी यावेळी दिली.

 

 

 

 

ज्येष्ठ नेते शरद पवार आज बारामती तालुक्याच्या दुष्काळी दौऱ्यावर आहे. येथील उंडवडी कप या ठिकाणी त्यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले यावेळी पवार बोलत होते.

 

 

 

 

पुढे बोलताना पवार म्हणाले की, गुजरात राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्याला कृषिमंत्री असताना प्रचंड मदत केली.

 

 

 

 

मी कधी असे बघितले नाही की, ते कोणत्या पक्षाचे आहेत. मी हे बघितलं किती एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्या राज्यातील शेतकरी सुखी करण्यासाठी मदत केली पाहिजे, हे धोरण नेहमी राबवले, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.

 

 

 

मागे एकदा नरेंद्र मोदी यांनी बारामतीला येण्याची इच्छा व्यक्त केली. इथे आल्यानंतर त्यांनी भाषण केले आणि त्या भाषणात त्यांनी सांगितले की, मी हे जे काही घडले आहे,

 

 

 

त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे की हे काम कसे करायचे हे मला पवार साहेबांनी बोट धरून शिकवले. आज तेच पंतप्रधान वेगळी भूमिका घेत आहेत. तसेच, कोणी वेगळी भूमिका घेतली तर त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.

 

 

 

 

 

झारखंड राज्याचे आदिवासी मुख्यमंत्री यांनी पंतप्रधानांवर टीका केली. आज त्यांना तुरुंगात टाकले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

 

 

 

 

 

यांनीही केंद्र सरकारवर टीका केली त्यांनाही आज जेलमध्ये टाकले आहे, असेही पवार यावेळी म्हणाले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *